लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आता कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेता, विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. असे असतानाच आता समाजवादी पार्टीशी युती असलेला राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) हा पक्ष भाजपाशी युती करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावरच आता समाजवादी पार्टीने प्रतिक्रिया दिली आहे. आरएलडीचे सर्वेसर्वा जयंत चौधरी कोठेही जाणार नाहीत, असा विश्वास समाजवादी पार्टीचे नेते शिवपालसिंह यादव यांनी व्यक्त केला.

शिवपालसिंह यादव काय म्हणाले?

“भाजपाकडून गोंधळ उडविण्याचे काम केले जात आहे. जयंत चौधरी हे कोठेही जाणार नाहीत. ते इंडिया आघाडीतच राहणार आहेत. ते भाजपाला पराभूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहेत,” असे शिवपाल यादव म्हणाले. जयंत चौधरी हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे आहेत आणि त्यामुळे ते कोठेही जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
provide government guest houses for interfaith couples says bombay high court
आंतरधर्मीय जोडप्यांसाठी अतिथीगृहे उपलब्ध करून द्या; उच्च न्यायालयाची सूचना
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?

अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. “जयंत चौधरी हे स्पष्ट विचाराचे आहेत. ते सुशिक्षित आहेत. त्यांना राजकारणाची समज आहे. सध्या राज्यातील शेतकरी आणि राज्याच्या कल्याणासाठी लढा चालू आहे. या लढ्याला ते कमकुवत करणार नाहीत, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे अखिलेश यादव म्हणाले.

आरएलडीला सात जागा

दरम्यान, १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय लोक दल आणि समाजवादी पार्टीने आपल्या युतीची घोषणा केली होती. समाजवादी पार्टीने आरएलडीला लोकसभेच्या एकूण सात जागा दिल्या आहेत. जागावाटपावर एकमत झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी समाजमाध्यमांवर या युतीची घोषणा केली होती. तसेच आम्ही भारतीय संविधान आणि राष्ट्रीय मूल्ये यांचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. आपल्या युतीतील सर्व कार्यकर्ते जोमाने काम करतील, अशी मला अपेक्षा आहे, असे मत जयंत चौधरी यांनी व्यक्त केले होते.

आरएलडी – समाजवादी पार्टीच्या युतीचा इतिहास काय?

याआधी दोन्ही पक्षांनी २०२२ सालची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. या निवडणुकीत समाजवादी पार्टीने १११; तर आरएलडीने आठ जागांवर विजय मिळवला होता. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) यांच्या युतीत आरएलडी पक्षाचाही समावेश होता. या निवडणुकीत आरएलडीला मथुरा, बाघपत, मुझफ्फरनगर या महत्त्वाच्या जागा मिळाल्या होत्या. मात्र, या तिन्ही जागांवर आरएलडीचा पराभव झाला होता. तर, समाजवादी पार्टीला पाच आणि बहुजन समाज पार्टीला १० जागांवर विजय मिळाला होता.

राज्यसभेच्या निवडणुकीत समाजवादीकडून आरएलडीला मदत

जयंत चौधरी यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी आरएलडीकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. तेव्हा समाजवादी पार्टीने आपली मते आरएलडीला दिली होती. असे असताना या लोकसभा निवडणुकीत आरएलडी पक्ष काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader