राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : काही दिवसांपूर्वीपर्यंत शरद पवार यांचे उजवे हात मानले जाणारे प्रफुल पटेल यांना त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात शह देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सुरू केला आहे. पवार घराण्यातील तरुण नेते रोहित पवार यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढवण्याची जबाबदारी शरद पवार यांनी सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पटेल हे शरद पवार यांच्यासोबत होते. याचा पटेल यांना राजकीय लाभही झाला. लोकसभा निवडणुकीत अनेकदा (१९९१, १९९६, १९९८, २००९ वगळता) पराभव होऊन देखील ते कायम राष्ट्रीय राजकारणात राहिले. राज्यसभेत गेले, मंत्रीपदी राहिले. पटेल मूळचे गोंदियाचे आणि त्यांचा प्रभाव देखील गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांपुरता आहे. भंडारा जिल्ह्यात प्रभाव नाही. याची प्रचिती लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवातून आली. पण शरद पवार यांच्या मर्जीतील नेता म्हणून ते कायम दिल्लीत सक्रिय राहिले. त्यातून त्यांनी विधानसभेच्या एक-दोन मतदारसंघावर प्रभाव निर्माण केला. त्यांचे काही समर्थक जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आहेत. आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रफुल पटेल अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे पवार यांना धक्का बसला आहे. शरद पवारांनी या सर्व बाबींचा विचार करून पटेलांच्या मैदानावर रोहित पवार यांना उतरवले आहे.

आणखी वाचा-संघाशी संबंधित संस्था असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी बैठकीला मारली दांडी; कारवाई होणार?

अजित पवार यांच्या बंडानंतर प्रमुख बंडखोरांच्या मतदारसंघात, जिल्ह्यात दौरे, सभा घेण्यास शरद पवार यांनी सुरुवात केली आहे. ते गोंदियातही सभा घेणार आहेत. यानिमित्ताने शरद पवार यांच्या घरण्यातील युवा नेते विरुद्ध प्रफुल पटेल असा सामना रंगण्याचे चिन्ह आहे.