पंढरपूर : माढा लोकसभा मतदार संघात सुरवातील भाजपाच्या उमेदवारीला विरोध , उमेदवार बदला,मनधरणी ,बैठका झाल्या. मात्र गेल्या तीन चार दिवसापासून भाजपने भूमिका बदलत जाहीर उमेदवाराला प्रचार आणि स्थानिक नेत्यांना रणनीती ठरवण्यासाठी बैठका सुरु आहेत. तर दुसरीकडे नाराज मोहिते पाटील यांचा मतदार संघात प्रचार सुरु असून त्यांनी भूमिका जाहीर केली नाही . तर माढा लोकसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) गटाकडे असल्याने पवार आता केंद्र बिंदू ठरत आहेत. शरद पवार यांच्या भेटीला धर्यशील मोहिते – पाटील, शेकापाचे डॉ अनिकेत देशमुख, राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी भेट घेवून उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा आहे.
माढ्यात भाजपा कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली. मात्र त्याला सुरवातीला जेष्ठ नेते विजयसिंह मोहते – पाटील यांचे पुतणे धर्यशील मोहिते – पाटील यांनी विरोध केला. त्या नंतर काही दिवसांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन मोहिते पाटलांच्या भेटीला अकलूज येथे गेले. तेथे मोहिते – पाटील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आणि महाजन यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. या घडामोडी नंतर मोहिते पाटील यांनी मतदार संघातील गाव भेटी सुरु केल्या. यात अनेक ठिकाणी त्याना पाठिंबा तर अनेक ठिकाणी तुतारी हाती घ्या असा जोर वाढू लागला. तसेच जयसिंह मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेवू असा इशारा भाजपला दिला.
हेही वाचा… पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
हेही वाचा… LS Election 2024: “लोकशाहीसाठी ‘जिंका वा मरा’ अशी निवडणूक”, मोदी सरकार विरोधात स्टॅलिन यांचे रणशिंग!
त्या नंतर मुंबई येथे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते – पाटील, आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.. त्यानंतर भाजपाने मोहिते – पाटील यांना बेदखल केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाच्या उमेदवाराने जोराने प्रचाराला सुरवात केली. निवडणुकीच्या रणनितीसाठी बैठका सुरु आहेत. नुकतेच माळशिरसचे उत्तम जानकर यांची नाराजी दूर करून प्रचारात सामील करून घेतले. मात्र दुसरीकडे नाराज मोहिते पाटील हे मतदार संघ पिंजून काढत आहेत. फलटण तालुक्याचे माजी दिवंगत आमदार चिमणरावजी कदम यांचे पुत्र भैय्या कदम यांची भेट मोहिते पाटील यांनी घेतली. आता मोहिते पाटील यांचे समर्थकांनी हाती तुतारी घ्या असा जोर वाढवला आहे. मात्र या घाडमोडी होत असताना दुसरीकडे शरद पवार यांना संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी भेट घेतली. तसेच सांगोल्याचे शेकापचे डॉ अनिकेत देशमुख यांनी पवारांची भेट घेतली. देशमुख हे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आहे. ते धनगर समजाचे असून मतदार संघात जवळपास पाच लाख मतदार धनगर समजाचे आहेत. तसेच पक्षाचे अभयसिंह जगताप हे देखील इच्छुक असून प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे मोहिते पाटलांचा जुना संबध कामी येणार का जातीय समीकरण पाहून उमेदवार देणार हे पाहण औत्सिक्याचे आहे .