RSS on Issues with BJP: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक २४० जागा मिळाल्या. केंद्रात सत्ता आली असली, तरी भाजपाला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत. निकालांनंतर पक्षीय पातळीवर निकालाचं विवेचन करण्यासाठी विचारमंथनही झालं. त्याचवेळी बाहेर आरएसएसशी समन्वयाचा अभाव हे कारण असल्याचं बोललं जाऊ लागलं. यासंदर्भात भाजपा किंवा RSS यांच्याकडून कोणत्याही प्रकारे समर्थन देणारी भूमिका जाहीर करण्यात आलेली नव्हती. मात्र, केरळमधील अखिल भारतीय समन्वय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी समन्वयाचा अभाव असल्याचं अप्रत्यक्षरीत्या मान्य करत त्यासंर्भात योग्य त्या यंत्रणेमार्फत अडचणी सोडवल्या जातील, अशी भूमिका मांडली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी ‘भाजपाला पूर्वी संघाची गरज लागत होती, आता भाजपा स्वयंपूर्ण झाली आहे’, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यामुळे आरएसएसमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोठा फटका बसला. पक्षाला २४० तर एनडीए मिळून २९४ चा पल्ला गाठता आला. या पार्श्वभूमीवर आरएसएसच्या नाराजीच्या चर्चांना बळ मिळत राहिलं.

Vinod Tawde pune, Mahayuti, Maratha Reservation,
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Ajit Pawar
Ajit Pawar : RSS कडून लोकसभेतील पराभवाचं खापर, विचारधाराही वेगळी, तरी महायुतीत का? अजित पवार म्हणाले…
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Ajit pawar on NCP BJP Alliance
Gautam Adani BJP-NCP Alliance Talks : “राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीच्या बैठकीत गौतम अदाणीही होते”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा

दरम्यान, केरळच्या पलक्कडमध्ये झालेल्या दोन दिवसीय बैठकीनंतर संघाचे प्रसिद्धीप्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. त्यावेळी भारतीय जनता पक्षासह आरएसएसशी संबंधित सर्वच संघटनांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी समन्वयाची समस्या असल्याचं अप्रत्यक्षरीत्या मान्य करतानाच तो आमचा कौटुंबिक मुद्दा असून त्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम कर आहे, असं नमूद केलं.

RSS चे जातनिहाय जनगणनेला समर्थनाचे संकेत, पण…

“आरएसएस आता १०० वर्षं पूर्ण करत आहे. हा खूप मोठा प्रवास आहे. अशा मोठ्या प्रवासांमध्ये व्यवस्थापनात्क अडचणी येत असतात. आमच्याकडे अशा गोष्टींवर काम करण्यासाठी एक व्यवस्था आहे. त्यासाठी आमच्याकडे औपचारिक, अनौपचारिक बैठका होत असतात. तुम्ही आरएसएसचा १०० वर्षांचा प्रवास पाहात आहात. या सर्व प्रश्नांवर तो प्रवास हेच उत्तर आहे”, असं सुनील आंबेकर म्हणाले.

बैठकीत जे. पी. नड्डांच्या वक्तव्यानंतरच्या स्थितीवरही चर्चा!

दरम्यान, जे. पी. नड्डा यांच्या स्वयंपूर्णतेच्या विधानानंतर निर्माण झालेली समन्वयाची अडचण आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकांदरम्यान आरएसएसच्या काडरच्या उत्साहात जाणवलेली कमतरता यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सूतोवाच आंबेकर यांनी दिले. “इतर समस्याही लवकरच सोडवल्या जातील. तो आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. तीन दिवसांची बैठक झाली आहे. त्यात प्रत्येकानं सहभाग घेतला होता. सर्वकाही ठीक चालू आहे”, असं आंबेकर यांनी नमूद केलं.

समन्वयाचा मुद्दा एकदाही नाकारला नाही!

एकीकडे संघ-भाजपातील संभाव्य मतभेदाबाबतच्या प्रश्नांना यशस्वीपणे उत्तरं देतानाच आंबेकर यांनी एकदाही दोन्हींमधील समन्वयाच्या अभावाचा मुद्दा नाकारला नाही. दोन्ही संघटनांमध्ये काही अडचणी असल्याचं पहिल्यांदाच संघानं जाहीरपणे मान्य केल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, आरएसएस व भारतीय जनता पक्ष या संघटना त्यांच्या मूलभूत विचारसरणी व त्यावरील श्रद्धा याबाबत एकाच विचारावर विश्वास ठेवणाऱ्या असाव्यात, हे महत्त्वाचं असल्याचं आंबेकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. “RSS च्या या प्रवासात एक बाब नक्की आहे. आरएसएसमध्ये राष्ट्र प्रथम ही भूमिका कायम आहे. प्रत्येक स्वयंसेवकाचा हा विश्वास आहे की आपलं राष्ट्र सनातन आहे. शाश्वत आहे.त्यामुळे या देशात आगामी काळात उज्ज्वल क्षितिज गाठण्याची क्षमता आहे. त्यामुळे आम्ही सगळे देशसेवेसाठी समर्पित आहोत. हा आरएसएसचा मूलभूत विचार आहे. इतर गोष्टी फक्त व्यवस्थापनात्मक आहेत. त्यामुळे आरएसएसशी संबंधित सर्व संस्था, संघ स्वयंसेवकांचा या विचारावर विश्वास आहे आणि ते याची अंमलबजावणी करतात”, असं आंबेकर म्हणाले.

भाजपाला संघ स्वयंसेवक मिळेनात?

भारतीय जनता पक्षाला संघटनेच्या स्तरावर आरएसएसचे स्वयंसेवक पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी विचारताच त्यावर आंबेकर यांनी स्पष्टीकरण दिलं. “भाजपामध्ये अगदी आजही खूप सारे आरएसएस स्वयंसेवक व प्रचारक आहेत. त्यामुळे हा मुद्दा उपस्थितच कसा झाला? कोणत्या प्रचारक वा स्वयंसेवकाला कुठली जबाबदारी द्यायची, हा सर्वस्वी आरएसएसचा मुद्दा आहे. त्यासाठी खूप सारे निकष आहेत. ही बऱ्याच काळापासून यशस्वीरीत्या चालत आलेली व्यवस्था आहे. त्यामुळे त्यात कोणतीही समस्या नाही”, असं आंबेकर यांनी स्पष्ट केलं.

सुनील आंबेकर यांनी मांडलेल्या या भूमिका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. कारण आरएसएसच्या या बैठकीमध्ये भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही सहभागी झाले होते व त्यांनी यादरम्यान, आरएसएसच्या अनेक उच्चपदस्थांच्या भेटीही घेतल्या. नड्डा यांनी केलेल्या त्या विधानानंतर पहिल्यांदाच ते आरएसएसच्या उच्चपदस्थांना भेटत होते. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. आगामी काळात भाजपाला अवघड अशा हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड व महाराष्ट्र या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे. त्यामुळे संघ व पक्षामधील हे मतभेद त्याआधीच संपुष्टात येणं भाजपासाठी महत्त्वाचं आहे.