RSS – BJP Together for Maharashtra Elections: देशात लोकसभा निवडणुका होण्याच्याही आधीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या एका विधानामुळे तर ही दरी आणखीनच वाढली. त्यात महाराष्ट्रात अजित पवारांना सत्तेत घेतल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आल्यामुळे भाजपा व आरएसएसमधील दरी आणखीनच वाढल्याचं दिसून येत होतं. या पार्श्वभूमीवर नुकतंच देवेंद्र फडणवीसांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस संघटनेची मदत होत असल्याचं सांगितल्यानंतर ही दरी निवडणुकीपुरती का होईना, मिटल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वरवर पाहाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक किंवा त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आवाहनांमध्ये भारतीय जनता पक्षाचा थेट प्रचार दिसणं कठीण आहे. पण संघाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरएसएसचे स्वयंसेवक दारोदार फिरून मतदारांना भाजपा घटक असणाऱ्या महायुतीसाठी मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
“हिंदू समाज व या समाजाच्या सदस्यांना सामना कराव्या लागणार्या आव्हानांचा विचार करूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये कृतीशील सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पद्धतशीर नियोजन करण्यात आलं आहे. यावेळी हा प्रचार अधिक प्रभावीपणे केला जात आहेत. आरएसएसचे स्वयंसेवक छोट्या छोट्या गटांमध्ये लोकांपर्यंत पोहोचत आहेत. या भेटीत ते मतदारांना फक्त १०० टक्के मतदानासाठी बाहेर पडण्याचंच आवाहन करत नसून कुणाला मत द्यायचं हेही ते सांगत आहेत”, अशी माहिती एका संघ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
नड्डांचं विधान आणि ताणले गेलेले संबंध!
लोकसभा निवडणुकांवेळी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचं विधान केलं होतं. आता पक्ष स्वावलंबी झाला असल्याचंही ते म्हणाले होते. नड्डांच्या या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सांगितलं जातं. भाजपा लोकसभा निवडणुकांमध्ये ३०३ जागांवरून २४० जागांपर्यंत खाली येण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष यांच्यातील संवादाचा अभाव कारणीभूत मानण्यात आला. भाजपाला मोठा फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता. महाराष्ट्रात भाजपाच्या जागा २३ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या.
लोकसभा निवडणुकांमध्ये बसलेल्या फटक्यापासून धडा घेऊन भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संवाद वाढवला. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत: देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांच्या नियोजनासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत किमान अर्धा डझन बैठका घेतल्या. भाजपाची ताकद कमी असणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आरएसएसनं स्वयंसेवकांचे गट पाठवले. “भाजपा आणि आरएसएसमध्ये एकमेकांकडे माहितीची दररोज देवाण-घेवाण करण्यासाठी एक यंत्रणा उभी करण्यात आली”, अशीही माहिती भाजपातील सूत्रांकडून देण्यात आली.
मार्ग स्वतंत्र, पण काम एकत्र!
“आरएसएस आणि भाजपा या दोन स्वतंत्र भूमिका निभावणाऱ्या दोन स्वतंत्र संघटना आहेत. आमची विचारसरणी एकच असल्यामुळे आम्ही एकमेकांशी संबंधित आहोत. पण कोणत्या उमेदवाराला निवडणुकीसाठी तिकीट द्यायचं हे आम्ही भाजपाला सांगत नाही किंवा तेही आम्हाला काही सांगत नाहीत”, अशी प्रतिक्रिया एका आरएसएस पदाधिकाऱ्यानं दिली.
संघाच्या सहकाऱ्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? वाचा सविस्तर
दुसऱ्या एका आरएसएस पदाधिकाऱ्यानं यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती दिली. “भाजपा आणि आरएसएसच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक स्पष्ट फरक आहे. आमचे स्वयंसेवक जाहीर प्रचारसभा घेत नाहीत किंवा एखाद्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहनही करत नाहीत. हिंदूंच्या एकात्मतेला धोका निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवर व्यापक जनजागृती करण्यासाठी आरएसएसनं आपली एक यंत्रणा कार्यरत केली आहे. एक सक्षम हिंदू राष्ट्र उभं करण्याचं आमचं ध्येय आहे. हे राष्ट्र कोणत्याही जात, धर्म वा समाजाची आडकाठी न मानता प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करेल”, असं या पदाधिकाऱ्यानं नमूद केलं.
प्रचारात हिंदू एकतेचा मुद्दा
दरम्यान, संघाच्या याच हिंदू एकतेच्या तत्वाचा संदर्भ भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रचारामध्ये दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचं धोरण समाजात फूट पाडणारं असल्याची टीका करताना त्यापासून ओबीसी व अनुसूचित जमातींचं रक्षण करण्यासाठी ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील अशाच एका प्रचारसभेत बोलताना मतदानांना ‘बटेंगे तो कटेंगे’ असा इशारा दिला.