यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेला प्रचार आणि एकंदर कामगिरीवरूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपावर नाराज असल्याचे चित्र आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही थेट नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत. दुसऱ्या बाजूला संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायझर’मध्येही भाजपाच्या कामगिरीचे विश्लेषण करत भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा ऑर्गनायझरमध्येच प्रकाशित झालेल्या लेखावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपामधील विसंवाद समोर आले आहेत. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबाबत हा लेख असून लोकसंख्येच्या असंतुलनाबाबत त्यामध्ये भाष्य करण्यात आले आहे. हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. तसेच पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांमधील जन्मदर घटल्याचाही उल्लेख या लेखामध्ये करण्यात आला आहे. या राज्यांमधील जन्मदर कमी असल्यामुळे मतदारसंघांच्या पुनर्रचनेदरम्यान त्यांना तोटा होऊ शकतो, अशी मांडणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात मतदारसंघांची पुनर्रचना होणे प्रस्तावित आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास, दक्षिणेकडील राज्यांचा त्यामध्ये तोटा होऊ शकतो, अशी या लेखाची मांडणी आहे. उत्तर भारतामधील राज्यांमध्ये भाजपाची पकड मजबूत आहे; मात्र दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपाचा प्रभाव ना के बराबर आहे. अशा पार्श्वभूमीवर मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे दक्षिणेकडील राज्यांचे महत्त्व कमी होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा