RSS Annual Meeting: ‘भाजपाला निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरलेली नाही’, असे विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीआधी केले होते. मात्र, लोकसभेत मर्यादित यश मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा संघाशी जुळवून घेण्याचा भाजपाचा कल दिसत आहे. महाराष्ट्रातही विधानसभेआधी संघ आणि भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. तर संघाच्या वार्षिक राष्ट्रीय बैठकीसाठी आता खुद्द जे. पी. नड्डा हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह उपस्थित राहणार आहेत. शनिवारपासून (दि. ३१ ऑगस्ट) तीन दिवसांची अखिल भारतीय समन्वयक बैठक केरळमधील पलक्कड येथे होत आहे. या बैठकीला संघ आणि संघ परिवाराशी संबंधित अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कोण कोण उपस्थित राहणार?

सरसंघचालक मोहन भागवत, सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे, सर्व सहा सहचिटणीस आणि वरिष्ठ कार्यालयीन पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर भाजपाकडून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस बी. एल. संतोष, सह सरचिटणीस शिव प्रकाश आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपाकडून काळजीवाहू अध्यक्ष या बैठकीला जाणार असल्याची मध्यंतरी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, जे. पी. नड्डा यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ दिल्यानंतर ते स्वतः या बैठकीला हजर राहणार आहेत. पुढील वर्षभराचा संघ परिवाराचा कार्यक्रम या बैठकीत ठरविला जाणार आहे.

Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
ncp leader ajit pawar launch connect with people initiative
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता संवाद उपक्रम; आठवड्यातील तीन दिवस मंत्री पक्षाच्या मुख्यालयात
Will the post of CIDCO Board Chairman be changed soon
सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे

हे वाचा >> विधानसभा निवडणुकीत संघ सक्रिय; निर्णय प्रक्रियेत फडणवीसांचे पारडे जड

२ सप्टेंबरपासून भाजपाची राष्ट्रीय पातळीवरची सदस्य नोंदणी सुरू होत आहे. तसेच आगामी सहा महिन्यात देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यानंतरच भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली (यावर्षी किंवा पुढील वर्षी) या राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या राज्यांतील निवडणूक भाजपासाठी सोपी नाही.

दलित मतदार भाजपापासून दूर

काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सामाजिक समरसता अभियान राबवत आहे. जातीमधील दरी कमी करणे आणि हिंदू एकतेचे नरेटिव्ह स्थापन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केले जात आहेत. मात्र, यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दलित मतदार हे भाजपापासून दूर गेल्याचे दिसले, ज्यामुळे भाजपाला केवळ २४० जागा मिळविता आल्या. संघातील एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, काँग्रेसने संविधान बदलणार असा अपप्रचार केला, त्याला चोख प्रत्युत्तर देता आले नाही.

जे. पी. नड्डा यांच्या विधानामुळे संघात नाराजी

भाजपा आणि संघात चांगला समन्वय राखण्याची गरज लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झाली आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे भाजपाचे काम केले नसल्यामुळे निवडणुकीत त्याचा फटका बसल्याचे दिसले. “भाजपा आता स्वयंपूर्ण झाला असून निवडणुकीसाठी संघाची गरज उरलेली नाही”, असे विधान भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केले होते, ज्यामुळे संघात नाराजी पसरली होती, असेही या नेत्याने सांगितले.

हे ही वाचा >> ‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह

कोणकोणत्या विषयावर बैठकीत चर्चा होणार?

भाजपा आणि संघातील समन्वयाखेरीज या बैठकीत इतर काही मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. बांगलादेशातील हिंदू अत्याचाराचा मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा होईल. बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू अत्याचाराबाबत संघ आणि भाजपाने आधीच चिंता व्यक्त केलेली आहे. तसेच हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेबरोबरही जोडला गेला आहे, असाही मुद्दा संघाने उपस्थित केला होता.

याशिवाय समान नागरी संहिता, जातनिहाय जनगणना आणि अनुसूचित जाती-जमातीचे वर्गीकरण या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व विषयांवर भाजपा आणि एनडीएतील घटक पक्षांचे आपापसात मतभेद आहेत.

Story img Loader