एजाजहुसेन मुजावर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अलीकडे रक्तरंजित राजकारणाने बदनाम झालेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट परिसरात विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रमांतून जनसंपर्क वाढवताना राजकीय संधी हेरून आणि समर्थ नेत्यांचा आधार घेत पुढचे पाऊल टाकण्याचे कसब दाखवणारे अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे समाजकारण आणि राजकीय डावपेचांची हुकमी गोळाबेरीज करणारे तरुण नेते आहेत. या कौशल्याची पावती म्हणूनच त्यांना वयाच्या ४१ व्या वर्षी सोलापूर जिल्हा भाजपचे अध्यक्षपद मिळाले आहे.
हेही वाचा… निलेश राऊत : माणसांना जपणारा कार्यकर्ता
ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात आल्यावर ते संबंध दृढ करण्याचे आणि विश्वास मिळविण्याचे कसब या बरोबरच नशिबाने तेवढीच दिलेली साथ, या बळावर सचिन कल्याणशेट्टी हे २०१९ मध्ये भाजपचे आमदार झाले. राजकारण व समाजकारण करताना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करीत स्वतःची प्रतिमा अल्पावधीतच विकसित करीत शैक्षणिक पातळीवर पदवीधर असलेले आणि व्यवसायाने शेतकरी असलेल्या कल्याणशेट्टी यांची राजकीय वाटचाल आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र भाजपातील संघटनात्मक राजकारणात सुरू झाली आहे.
हेही वाचा… बच्चू कडूंच्या शक्तीप्रदर्शनातून मंत्रिपदासाठी दबावगटाचे राजकारण?
अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात गेल्या ३०-३५ वर्षात स्थानिक लिंगायत समाजाने काँग्रेसविरोधी नकारात्मक भूमिकेतून भाजपला साथ दिली आहे. सुरुवातीला भाजप रूजविण्यासाठी दिवंगत माजी आमदार बाबासाहेब तानवडे, पंचप्पा कल्याणशेट्टी आदी मोजकी मंडळी सक्रिय होती. स्थानिक कारणांमुळे पंचप्पा कल्याणशेट्टी भाजपपासून दुरावले नंतर काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्याशी त्यांचे मैत्र जुळले. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे त्यांचेच पुत्र. वडिलांच्या अयशस्वी राजकारणाच्या पश्चात सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेली वाटचाल ही लक्षणीय आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
भाजपची लिंगायत समाजावर मजबूत पकड राहिल्यामुळे याच समाजाचे असलेले सचिन कल्याणशेट्टी हे १५ वर्षांपूर्वी भाजपचे नेते सुभाष देशमुख यांच्या संपर्कात आले. त्यानंतर वडीलांची काँग्रेसचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांच्याशी असलेली मैत्री बाजूला ठेवून भाजप एके भाजप असे राजकारण सुरू केले. देशमुख यांच्या लोकमंगल परिवाराचे सदस्यही झाले. एव्हाना, अक्कलकोटच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात असताना सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव समोर आले. तोपर्यंत महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमाला, सामूहिक विवाह सोहळा, योगगुरू रामदेव बाबांचे योगासन शिबिर आदी उपक्रम सुरू केले होते. तर, भाजपचे तत्कालीन आमदार सिद्रामप्पा पाटील हे पक्षापासून दुरावले होते. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने वादग्रस्त प्रतिमा नसलेले आणि लोकोपयोगी उपक्रमांमधून चांगला जनसंपर्क असलेले सचिन कल्याणशेट्टी यांना प्रोत्साहन दिले. २०१९ सालच्या अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत कल्याणशेट्टी निवडून आले. सोलापूरचे माजी पालकमंत्री असलेले लिंगायत समाजाचे विजय देशमुख यांना शह देण्याच्या पक्षांतर्गत राजकारणात सुभाष देशमुख यांच्याकडून कल्याणशेट्टी यांना ताकद मिळत गेली. ते थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तुळात गेले. याच विश्वासार्हतेमुळे सध्याच्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कल्याणशेट्टी यांचे नाव चर्चेत राहिले. काही महिन्यांपूर्वी भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे बदनामीच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे पदावरून पायउतार झाले असता पक्षश्रेष्ठींनी कोणत्याही वादापासून दूर राहिलेला आणि समाजकारण व राजकारणाची हुकमी गोळाबेरीज करण्याचे तंत्र अवगत असलेला आश्वासक तरुण चेहरा म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तत्पूर्वी, गोवा विधानसभा निवडणुकीतही पक्षाने दिलेली जबाबदारी संयमी वृत्तीचे सचिन कल्याणशेट्टी यांनी यशस्वी करून दाखविली होती.