राजस्थान विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असतानाच येथे काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. नेतृत्वबदलाची मागणी घेऊन काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी वसुंधरा राजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करत अशोक गेहलोत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. असे असतानाच अशोक गेहलोत लवकरच नवा पक्ष काढणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा मात्र काँग्रेसने फेटाळून लावली आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) केसी वेणुगोपाल यांनी व्यक्त केला आहे.

वेणुगोपाल यांनी घेतली पायलट यांची तीन वेळा भेट

सचिन पायलट पक्ष सोडण्याची चर्चा ही केवळ एक अफवा आहे, असे वेणुगोपाल म्हणाले आहेत. गेहलोत-पायलट यांच्यातील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. हा वाद मिटवण्यासाठी वेणुगोपाल हेदेखील प्रयत्न करत आहेत. त्यांनी २९ मेपासून पायलट यांची आतापर्यंत तीन वेळा भेट घेतली आहे. यासह काँग्रेसचे नेतृत्वाने २९ मे रोजी गेहलोत आणि पायलट यांच्यासोबत एकत्र बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीतून काहीही तोडगा निघालेला नाही.

rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
NCP Sharad Chandra Pawar party has been consistently claiming that it has suffered losses due to the confusion between the Tutari and Pipani symbols in the Lok Sabha elections.
Supriya Sule: “भाजपाकडून रडीचा डाव, अजित पवारांनीही दिली कबुली”, तुतारी-पिपाणीवरुन सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका
What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, “फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वच्छ…”
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा

राजस्थान काँग्रेस एकत्रच असेल, अफवांवर विश्वास ठेवू नका- वेणुगोपाल

पायलट लवकरच नवा पक्ष काढण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना खुद्द सचिन पायलट यांनी याबाबत मात्र मौन बाळगले आहे. केसी वेणुगोपाल यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. “सचिन पायलट नवा पक्ष काढतील असे मला वाटत नाही. या सर्व अफवा आहेत. माझ्या माहितीप्रमाणे राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत,” असे वेणुगोपाल म्हणाले. “मी आतापर्यंत सचिन पायलट यांना दोन ते तीन वेळा भेटलो. काळजी करू नये, आम्ही सर्वजण येत्या विधानसभा निवडणुकीत एकत्र लढू. राजस्थान काँग्रेस एकत्रच असेल. अफवांवर विश्वास ठेवू नका,” असेदेखील वेणूगोपाल यांनी सांगितले.

दोन ते तीन दिवसांत कायमस्वरुपी तोडगा?

मिळालेल्या माहितीनुसार आगामी दोन ते तीन दिवसांत काँग्रेस हायकमांड पायलट-गेहलोत वादावर कायमस्वरुपी तोडगा काढणार आहे. सचिन पायलट यांनी तीन प्रमुख मागण्या करत गेहलोत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. वसुंधरा राजे सरकारच्या काळातील कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी व्हावी, राजस्थान लोकसेवा आयोग बरखास्त करावा. तसेच नव्या कायद्यानुसार या आयोगावर नव्या व्यक्तींची नेमणूक करावी. पेपर फुटल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. या विद्यार्थ्यांना आर्थिक मतदीच्या स्वरुपात मदत करावी, अशा तीन मागण्या पायलट यांनी केल्या आहेत.

पायलट, गेहलोत दोंघावरही दबाव?

अशोक गेहलोत यांनी या सर्व मागण्या मान्य कराव्यात असा आग्रह पायलट आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना पायलट यांच्या मागण्या मान्य केल्यास सरकारची पिछेहाट होईल, असे अशोक गेहलोत समर्थकांना वाटत आहे. सचिन पायलट यांनी या मागण्या मान्य करण्यासाठी अशोक गेहलोत यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. असे असले तरी गेहलोत सरकारने या मागण्यांवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पायलट यांच्यावर दबाव वाढतो आहे. त्यामुळे आगामी काळात सचिन पायलट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सचिन पायलट यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद?

दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाकडून गेहलोत-पायलट वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. या प्रकरणावरील तोडगा म्हणून काँग्रेस पायलट यांच्याकडे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सोपण्यास तयार आहे. मात्र पायलट प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास उत्सुक नाहीत. गेहलोत गटातील नेतेदेखील पायलट यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे काँग्रेस हायकमांड या वादावर नेमका कोणता तोडगा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.