राजस्थान विधानसभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सरकार त्यांच्याच एका सहकाऱ्यामुळे सध्या अडचणीत आले आहे. सरकारच्या विरोधात भाष्य केल्यानंतर शुक्रवारी (दि. २१ जुलै) राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. उदयपुरवाटी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या राजेंद्र सिंह गुढा यांनी आता सरकारविरोधात आणखी एक मोठा आरोप केला आहे. राजस्थान विधानसभेत लाल रंगाची डायरी आणून त्यातील मजकूर वाचून दाखविण्याची विनंती आमदार गुढा यांनी केली. मात्र त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर विधानसभेतच इतर काँग्रेस आमदारांसमवेत त्यांची झटापट झाली. सोमवारी (२४ जुलै) आमदार गुढा यांना विधानसभा सभागृहातूनही बाहेर काढण्यात आले, मार्शलचा आधार घेऊन त्यांना सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

मणिपूरमधील आदिवासी महिलांवरील अत्याचारानंतर भाजपा सरकार अडचणी आले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान आणि छत्तीसगडच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. भाजपाच्या या आरोपाचा आधार घेऊन राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी स्वपक्षाच्या सरकारवरच आरोप केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री गहलोत यांनी त्यांची हकालपट्टी केली. या हकालपट्टीनंतर रविवारी गुढा यांनी लाल डायरी बाहेर काढण्याचे सुतोवाच केले. ते म्हणाले की, २०२० साली काँग्रेसचे सभागृह नेते धर्मेंद्र राठोड यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली होती, तेव्हा अशोक गहलोत यांच्या सूचनेवरून त्यांनी धाडीदरम्यान ही लाल डायरी मिळवली होती.

Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

हे वाचा >> ‘आमची तुलना मणिपूरमधील तुमच्या अपयशाशी करू नका’, राजस्थान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे मोदींना प्रत्युत्तर

रविवारी झुंझुनूं जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत असताना गुढा म्हणाले की, जर मी ही डायरी मिळवली नसती तर तेव्हाच गहलोत तुरुंगात गेले असते. २०२० साली काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवले होते. धर्मेंद्र राठोड हे मुख्यमंत्री गहलोत यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात.

गुढा यांनी रविवारी २०२० च्या प्रसंगाची सविस्तार माहिती देताना सांगितले, “मुख्यमंत्रीजी मी जर त्यावेळी नसतो, तर तुम्ही तुरुंगात गेला असता… त्यावेळी तुम्ही मला म्हणाला होतात की, गुढा, आता सर्वकाही तुझ्या हातात आहे. मी १५० सीआरपीएफ जवानांना चकवा देऊन नवव्या मजल्यावर पोहोचलो होतो आणि गेट तोडून ती लाल डायरी मिळवली होती, गहलोत साहेब जर मी नसतो तर तुम्ही आता मुख्यमंत्री नसता आणि तुरुंगात गेला असतात.” गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर ते लाल डायरीचा संदर्भ देत आहेत. मी डायरी मिळवल्यानंतर ती जाळली की नाही? याबाबत गहलोत यांनी अनेकदा विचारणा केल्याचेही गुढा यांनी सांगितले.

गुढा पुढे म्हणाले की, मागच्या वर्षी मुख्यमंत्री गहलोत यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व पाहुण्यांसमोर गहलोत म्हणाले होते, “जर गुढा नसते तर मी मुख्यमंत्री नसतो”

“आपण मणिपूरवर बोलण्याऐवजी राजस्थानमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत, त्याबाबत आत्मपरिक्षण केले पाहीजे”, असे वक्तव्य गुढा यांनी राजस्थान विधानसभेत केले होते, त्यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी त्यांची हकालपट्टी केली. मणिपूरमधील आदिवासी महिलांवर अत्याचार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाची पिछेहाट झाली होती. मात्र मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यानेच सरकारच्या कारभारावर बोट ठेवल्यामुळे भाजपाला आयते कोलीत मिळाले. भाजपाने गुढा यांच्या वक्तव्याचा आधार घेत, राजस्थान सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठेवल्याचा आरोप केला.

आणखी वाचा >> Rajasthan Politics: ब्राह्मण चेहऱ्यावर भाजपाचा विश्वास; पुनिया यांच्या जागी चंद्र प्रकाश जोशींची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर जाहीर कार्यक्रमात बोलताना गुढा म्हणाले, “मी काय चुकीचे बोललो? मी एवढेच म्हणालो की, राजस्थानमध्ये महिलांवर बलात्कार होत आहेत. मी सत्य बोलावे, यासाठीच जनतेने मला विधानसभेत पाठविले आहे. माता-भगिनींनी हे सरकार निवडून दिले, त्यानंतरही आपण त्यांना सुरक्षा प्रदान करू शकलेलो नाहीत. राज्यात रोज कुठे ना कुठे बलात्कार होत आहेत. हे मी राज्यातील सर्वात मोठ्या पंचायतीमध्ये (विधानसभा) बोललो, तर मी पाप केले का?”

गुढा यांच्या खळबळजनक दाव्यानंतर भाजपानेही हा विषय उचलून धरला आहे. आम्ही गुढा यांना आवाहन करत आहोत की, त्यांनी त्या डायरीमधील सत्य राजस्थानच्या जनतेसमोर मांडावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राजेंद्र रोठाड यांनी माध्यमांना दिली.

काँग्रेस पक्षाने मात्र राजेंद्र गुढा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रव्केत स्वरनीम चतुर्वैदी म्हणाले, “राजस्थानचे आमचे प्रभारी सुखजिंद्र सिंह रंधावा यांनी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतस्रा यांना गुढा यांची चौकशी करून त्यांचे भाजपाशी असलेले संभाव्या संबंध शोधण्यास सांगितले आहेत. गुढा आणि भाजपामध्ये समन्वय असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कारण गुढा यांनी वक्तव्य करताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी लगेचच त्यांना पाठिंबा दिला. गुढा मंत्री असताना त्यांनी या गोष्टी कधीच कशा बोलल्या नाहीत?”