मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. हे दोन्ही पक्ष विरोधकांच्या इंडिया या आघाडीचा भाग आहेत. मात्र, मध्य प्रदेशच्या निवडणुकीत जागावाटपावरून या दोन्ही पक्षांत वाद सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला जनाधार नाही. त्यामुळे या पक्षाने स्वत:चे उमेदवार उभे न करता, काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी घेतली आहे. तर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी अजय राय यांची ‘चिरकूट’ म्हणत निर्भत्सना केली असून इंडिया आघाडीची युती ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी असेल तर हेच सूत्र आम्ही उत्तर प्रदेशमध्येही लागू करू, अशी भूमिका अखिलेश यादव यांनी घेतली आहे. या दोन्ही पक्षांतील वाद आता चिघळत असून इंडिया आघाडीतील इतर घटकपक्षांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीच जागावाटप हवे, काँग्रेसची भूमिका

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने या प्रकरणात हस्तक्षेप करत योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आघाडीतील घटकपक्षांकडून केली जात आहे. विरोधकांची झालेली आघाडी ही फक्त २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच असावी. लोकसभा निवडणुकीसाठीच जागावाटप हवे, अशी काँग्रेसची भूमिका आहे; तर भाजपाला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीची भूमिका व्यापक हवी. फक्त लोकसभा निवडणूक नव्हे, तर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही आघाडीचा विचार व्हावा, असे प्रादेशिक पक्षांना वाटत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा मध्येच फिसकटली. त्यामुळे आता समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशमध्ये काही जागांसाठी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तसेच इंडिया आघाडीचा भाग असलेल्या आम आदमी पार्टी (आप) या पक्षानेदेखील मध्य प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत.

Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Chief Minister Devendra Fadnavis announcement regarding land registration Mumbai news
कोणत्याही कार्यालयातून दस्तनोंदणीची मुभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
raj thackeray mns (3)
MNS Party Changes: मनसे पक्षात मोठे फेरबदल होणार, राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीनंतर संदीप देशपांडे म्हणाले…
MLA Satej Patil urged workers after assembly defeat
विधानसभा अपयशाने खचणार नाही ; उभारी घेऊ सतेज पाटील
Changes in traffic in central city Pune print news
पुणे: शहराच्या मध्य भागातील वाहतुकीत आज बदल
Thane District Planning Committee meeting, Thane,
ठाणे : जिल्हा “नियोजन समिती बैठकीच्या” प्रतीक्षेत, पालकमंत्र्यांच्या अभावी बैठकीला मुहूर्त नाही
wholesale price index base year
घाऊक किंमत निर्देशांकाचे आधार वर्ष बदलणार, रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राकडून समिती

“इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने हस्तक्षेप करावा”

समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील काही घटकपक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. काही घटकपक्षांनी तर काँग्रेसशी याबाबत चर्चादेखील केली आहे. काँग्रेसने मोठे मन करत मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला काही जागा द्याव्यात, असे या पक्षांनी काँग्रेसला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आमच्यासाठी प्रत्येक जागा ही महत्त्वाची आहे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याच वादावर जदयू पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने हस्तक्षेप करावा. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीतील घटकपक्षांचे संबंध बिघडले तर त्याचा परिमाण देशपातळीवर होईल, असे त्यागी म्हणाले.

“…तर ते जनतेला आवडणार नाही”

राजद पक्षाचे राज्यसभेचे खासदार मनोज कुमार झा यांनीही समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील वादावर भाष्य केले आहे. इंडिया आघाडीचे ब्रीदवाक्य हे ‘जुडेगा भारत-जितेगा इंडिया’ असे आहे. त्यामुळे अशी प्रकरणं संवेदनशीलपणे हाताळायला हवीत. इंडिया आघाडीत अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ते जनतेला आवडणार नाही. लोक इंडिया आघाडीकडे आशेने पाहात आहेत, असे मत मनोज कुमार झा यांनी व्यक्त केले. तसेच या दोन्ही पक्षांतील वाद लवकर मिटावा, असी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

“राज्यातील घटकपक्षांत असंतोष”

दरम्यान, “या वादामुळे इंडिया आघाडीतील घटकपक्षांत अस्वस्थता आहे. पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार या राज्यांतील घटकपक्षांत असंतोष आहे”, असे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Story img Loader