उत्तर प्रदेश विधानसभेने गेल्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानणारा ठराव मंजूर केल्याने विरोधी समाजवादी पक्षातील (SP) फूट उघड झाली आहे. सपा नेत्यांच्या एका गटाने ठराव आणण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर इतरांनी त्याला समर्थन दिले आहे. विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी मंगळवारी सर्व आमदारांना ११ फेब्रुवारीला राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिल्याने विरोधी पक्षाचे सदस्य विशेषत: सपा आमदारांची तारांबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी जेव्हा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानणारा ठराव आवाजी मतदानाने सभागृहात मंजूर करण्यात आला, तेव्हा बहुतेक विरोधी आमदारांनी होकारार्थी मान हलवली. सभापतींच्या म्हणण्यानुसार, केवळ १४ आमदारांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा