२०२४ साली होणारी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तसेच भाजपाला सत्तेतून पायऊतार करण्यासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पहिला प्रयत्न म्हणून जून महिन्यात पटणा येथे विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. केसीरआर यांच्या पक्षातील नेते काँग्रेसवर सडकून टीका करत असतात. याच कारणामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केसीआर यांना नुकतेच लक्ष्य केले. विरोधकांच्या बैठकीला केसीआर यांना बोलवण्यात येत असेल तर आम्ही उपस्थित राहणार नाही, असे राहुल गांधी यांनी एका सभेत सांगितले आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केसीआर यांची भेट घेतली आहे.

विरोधकांच्या बैठकीत काय घडले, याची दिली माहिती

अखिलेश यादव यांनी सोमवारी (३ जुलै) हैदरबाद येथे केसीआर यांची भेट घेतली. या बैठकीत अखिलेश यादव यांनी केसीआर यांच्याशी विरोधकांच्या आघाडीचा उद्देश याबाबत चर्चा केली केली. अखेलश यादव केसीआर यांच्या जवळचे नेते मानले जातात. या बैठकीत यादव यांनी केसीआर यांना २३ जून रोजीच्या विरोधकांच्या बैठकीत नेमके काय घडले, याची माहिती दिली. तसेच या बैठकीत यादव यांनी केसीआर यांचे विरोधकांच्या आघाडीबाबत मत जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. येत्या १७-१८ जुलै रोजी बंगळुरू येथे विरोधकांची दुसरी बैठक होणार आहे.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
Rajan Salvi
Rajan Salvi : “योग्यवेळी योग्य निर्णय घेणार”, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान; पक्ष बदलाचे दिले संकेत

अखिलेश यादव विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून भेटायला गेले नव्हते 

मिळालेल्या माहितीनुसार अखिलेश यादव हे विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून केसीआर यांना भेटायला गेले नव्हते. यादव यांनी वैयक्तिक स्तरावर त्यांची भेट घेतली. या बैठकीत बीआरएस पक्ष भाजपाबाबत मवाळ धोरण का अवलंबतो, हेही यादव यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

देशातील राजकीय घडामोडींवरही चर्चा

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरही चर्चा केली. विरोधकांना एकत्र आणण्याच्या  प्रयत्नात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र  राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी शिंदे गट-भाजपा पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या बंडखोरीचा विरोधकांच्या ऐक्यावर काय परिणाम पडणार, यावही चर्चा करण्यात आली. 

अखिलेश यादव-के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला महत्त्व

राहुल गांधी तेलंगणाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नुकतेच बीआरएस पक्षावर सडकून टीका केली. आम्ही तेलंगणामध्ये बीआरएस पक्षाशी युती करणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी अखिलेश यादव यांनी के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अखिलेश यादव- के. चंद्रशेखर राव यांच्या या भेटीला महत्त्व आले आहे.

Story img Loader