Akhilesh Yadav PDA For Loksabha आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सपा हा पक्ष इंडिया आघाडीसोबत असला तरीही उत्तर प्रदेशमधील जातीय समीकरणं लक्षात घेऊन, सपा आपले धोरण तयार करीत आहे. या निवडणुकीत सपाने मागास, दलित आणि अल्पसंख्याक मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून, ‘पीडीए’ सूत्र तयार केले आहे. पी म्हणजे पीछडा (मागास), डी म्हणजे दलित व ए म्हणजे अल्पसंख्याक, असा याचा अर्थ आहे. त्यावर पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांनी सपा नेतृत्वावर टीका केली आहे. पक्ष जे सांगतो, त्याच्या विरुद्ध वागत असून, पीडीए समुदायाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंगळवारी ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पक्षातून बाहेर पडले. सपा दलित आणि अल्पसंख्याक मतदारांवर लक्ष केंद्रित करून, आपल्या पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरण तयार करीत आहे. त्यासह या पक्षाला मित्रपक्षांच्या मागण्यांचाही विचार करायचा आहे. त्यामुळे समाजवादी पक्षासाठी हे एक आव्हान असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा