Azam Khan : गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? यावरून आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद सुरु असल्याची चर्चा आहे. आता इंडिया आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी तुरुंगातून राजकीय बॉम्ब फोडला आहे. ज्याची चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकारणात सुरू झाली आहे. आझम खान यांनी तुरुंगातून एक पत्र पाठवलं. त्यात विरोधी आघाडीने रामपूरच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मुस्लिम नेतृत्वावर मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आझम खान यांना २०१६ मध्ये रामपूर न्यायालयाने दरोडा आणि प्राणघातक हल्ला प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्या प्रकरणी आझम खान हे तुरुंगात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्यांच्यावर १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून आतापर्यंत सहा प्रकरणांमध्ये ते दोषी ठरले आहेत. रामपूर हा एकेकाळी सपा नेत्यांचा बालेकिल्ला होता. त्यांच्या या पत्रामुळे सपा आणि काँग्रेस दोन्ही अडचणीत सापडले आहेत. या पत्रावर वर ‘सपा’ने मौन बाळगलं आहे, तर आझम खान यांच्या टिप्पण्यांना प्रतिसाद देण्यास ‘सपा’ने नकार दिल्याने काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे.
‘सपा’चे जिल्हाध्यक्ष अजय सागर यांच्या लेटरहेडवर लिहिलेल्या पत्रात आझम खान यांनी पक्षाला रामपूरमधील मुस्लिमांवरील अत्याचाराचा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती केली. पण पक्ष संभलचा मुद्दा उचलत होते. दरम्यान, पत्रात म्हटलं आहे की, “इंडिया आघाडी रामपूरच्या समस्यांबाबत काही बोलण्यास तयार नाही आणि रामपूरमधील मुस्लिम नेतृत्वाला संपविण्याचं काम केलं आहे. यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मुस्लिमांच्या परिस्थितीचा आणि भविष्याचा विचार करावा.” पत्रात असंही म्हटलं आहे की, देशातील सर्वात मोठ्या धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचा वापर त्याच्या विरोधात षड्यंत्र करणाऱ्या आणि केवळ सहानुभूती दाखवणाऱ्या लोकांकडून केवळ व्होट बँक म्हणून केला जाऊ शकत नाही.
हेही वाचा : Delhi Election 2025 : दिल्लीत भाजपाची उमेदवार आणि नेता निवडीत चालढकल? काय आहेत समीकरणं?
दरम्यान,’सपा’चे जिल्हाध्यक्ष अजय सागर यांनी सांगितलं की, आपण आझम खान यांची तुरुंगात भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी ते पत्र लिहीलं. पक्ष नेतृत्वाने माझ्याशी संपर्क साधला नाही. ते (खान) फक्त त्यांच्या मनातून बोलले. पण हे पत्र अशा वेळी आलं जेव्हा आझम खान यांचे सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबतचे संबंध बिघडले होते. या जागेवर मोहिबुल्ला नक्वी यांना उमेदवारी दिल्यानंतर खान यांनी हे पत्र लिहिले. नक्वी अनेक वर्षांपासून रामपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आझम खान यांच्या कडव्या आव्हानानंतरही नक्वी यांनी ९० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला, तर काँग्रेस-सपा युतीने एकत्रितपणे राज्यातील ८० लोकसभेच्या जांगापैकी ४३ जागा जिंकल्या. तर याआधीही एसपीने तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पुरेशी पावले उचलली नसल्याबद्दल खान यांनी नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, या पत्रापाबाबत पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी म्हणाले की, खान हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर माजी सपा खासदार एमटी हसन यांनी त्यांचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचे वर्णन केलं. त्यांनी म्हटलं की, खान यांच्या टिप्पण्यांमधून सपामधील मुस्लिम नेतृत्वाचे विचार प्रतिबिंबित होत नाहीत. त्यांच्यामुळे मला तिकीट देण्यात आले नाही. परंतु सत्य हे आहे की सपा हेच मुस्लिम समाजाचे हितचिंतक आहेत. तथापि काँग्रेस नेत्यांचे म्हणणं आहे की, जर सपाने आपल्या नेत्यांना लगाम घातला नाही तर अशी आणखी विधाने समोर येऊ शकतात.
काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी खान यांच्या घरी भेट दिली आणि पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. पण दोन सहयोगी एकमत नसतील या आणखी एका संकेतात मैनपुरीच्या सपा खासदार डिंपल यादव यांनी बुधवारी गौतम अदाणी आणि जॉर्ज सोरोस यांच्या मुद्द्यांवर संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि अदाणींचा मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली. दरम्यान, जेव्हा सपा सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांना इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, सध्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे इंडिया आघाडीचे नेते आहेत.