लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भूमिका बदलण्याची गरज आहे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्यानंतर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे शुक्रवारी यांनी कागल तालुक्यात स्वराज्य आणण्यासाठी राजकीय दिशा बदलण्याचे संकेत दिले. ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांना सांगून ही भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याची घोषणा रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. भाजपत असलेले घाटगे यांची अडचण झाली होती. त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली होती. तथापि याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे घाटगे यांनी पवार यांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी आज शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी प्रवीणसिंह पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील, कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, बाळ घोरपडे यांच्यासह अनेक वक्त्यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात वेळी कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेऊन नवे राजकारण करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

हेही वाचा >>>माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना घाटगे म्हणाले, की कागल विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे प्रगती होत नसल्याने विकासाला गती देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय घेतला जाईल. विरोधकांकडून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण होणार आहे. त्याला तोड देण्यास तयार राहिले पाहिजे. २०१९ ची विधानसभा निवडणूक आईसाहेबांनी सांगितल्यामुळे लढली होती. आताही त्यांनी तुतारी हाती घेण्यास सांगितलेले आहे. कागल विधानसभा मतदारसंघात स्वराज्य स्थापन करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली, तरी त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader