केरळमधील कोझिकोड येथे काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होते. कोझिकोड युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित केलेलं व्याख्यान काही कारणास्तव रद्द करण्यात आलं. मात्र, हे रद्द करण्याचे कारण राज्य काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून देण्यात आले नाही. कोझिकोडमधील काँग्रेसमधील एका नेत्याच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम रद्द केल्याचं समोर आलं आहे.

रविवारी ( २२ नोव्हेंबर ) ‘संघ परिवार आणि धर्मनिरपेक्षते पुढील आव्हाने’ या विषयावर शशी थरुर संबोधित करणार होते. पण, ऐनवेळी युवक काँग्रेसकडून हे व्याख्यान रद्द करण्यात आलं. यामागे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून व्याख्यान रद्द करण्यात आलं, असा आरोप करण्यात येत आहे. व्याख्यान रद्द करण्यामागे कोणतेही कारण पक्षाकडून देण्यात आलं नाही. त्यानंतर हे व्याख्यान कोझिकोड येथील जवाहर युथ फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलं. याला मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळाला होता.

Mohammad Rizwan says I want to be the captain of the team not the king
Mohammad Rizwan : ‘मला किंग नव्हे तर…’, पाकिस्तान संघाचा कर्णधार होताच मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य, रोख नेमका कोणाकडे?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Arvind Kejriwal
Attack On Arvind Kejriwal : दिल्लीतल्या पदयात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, आपचा भाजपावर गंभीर आरोप
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Eknath Shinde : “मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही..”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
mns mayuresh wanjale
“खडकवासलावर मनसेचा शंभर टक्के झेंडा फडकणार” मनसे उमेदवार मयुरेश वांजळेंचा विश्वास
sanjay raut on dadar mahim amit thackeray
Sanjay Raut : अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जर…”
Udhayanidhi Stalin vs L Murugan
स्टॅलिन हे नाव तमिळ आहे का? हिंदीच्या सक्तीकरणाला विरोध करणाऱ्या उदयनिधींना भाजपा मंत्र्याचे उत्तर

हेही वाचा : ‘आप’ने मुख्यमंत्र्यांना डिवचलं, भूपेंद्र पटेलांना ‘कटपुतली’ म्हणत केजरीवालांचा हल्लाबोल

व्याख्यान रद्द केल्यावरून आता राज्यातील काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के मुरलीधरन यांनी म्हटलं की, “मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणारे हे व्याख्यान रद्द करण्यामागे आहेत. यासाठी कट रचण्यात आला होता. त्यात युवक काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा सहभाग नाही. मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. पण, थरुर यांचे व्याख्यान रद्द करायला पाहिजे नव्हते.”

“थरुर यांना युवक काँग्रेसच्या स्टेजचा वापर करण्यापासून रोखण्यात येऊ नये. घडलेल्या प्रकाराची कोणतीही चौकशी करण्याची गरज नाही. पण, यामागे कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे,” असे म्हणत मुरलीधरण यांनी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते व्ही डी सतीसन यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : काँग्रेसकडून ‘औकात दाखवून देऊ’ची टीका; आता थेट मोदींकडून हल्लाबोल, म्हणाले “वीज, पाणी…”

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर यांना पाठिंबा देणारे कोझिकोडचे खासदार एम के राघवन यांनी व्याख्यान रद्द करण्यामागे कोणाची हात होता, याच्या चौकशीची मागणी केली आहे. तर, युवक काँग्रेसला व्याख्यान रद्द करण्यासाठी पक्षातील कोणीतरी निर्देश दिले होते, असे कोझिकोडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार यांनी सांगितलं. पण, अधिक माहिती देण्यास कुमार यांनी नकार दिला.