दिगंबर शिंदे
सांगली : महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर प्रथमच सांगलीत स्व. गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मशागत सुरू केली आहे. या हंगामातील मशागतीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना आमंत्रित करून मित्रपक्षाला एकजूट महत्वाची असल्याचा संदेश तर दिलाच पण याचबरोबर स्वपक्षीयांनाही काँग्रेसचे प्रभारी आ. एच. के. पाटील यांना आमंत्रित करून आपण उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचा संदेश दिला आहे.
सांगलीच्या तरूण भारत स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी काँगे्रस, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदार तर उपस्थित होतेच, पण याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, कोल्हापूरचे आमदार जयंत आसगावकर हेही उपस्थित होते. या कार्यक्रमात राजकीय चर्चा फारशी झाली नाही, कारण हा कार्यक्रमच पक्ष विरहीत ठेवण्याचा प्रयत्न झाला. भाजप नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आल्याने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह खासदार. संजयकाका पाटील हेही आवर्जुन उपस्थित होते. मात्र, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ अथवा त्यांचे समर्थक या कार्यक्रमापासून दूर होते.
हेही वाचा… राजस्थानच्या निवडणुकीत MIM उडी घेणार; मुस्लीम मतदारांना एकत्र येण्याचे ओवैसींचे आवाहन, म्हणाले…
या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे जिल्हा पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत सर्वच पदाधिकार्यांना आवर्जुन बोलावून ताकद दाखविण्याचा प्रयत्न झाला.या निमित्ताने निवडणुकीतील उमेदवारीची स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कारण दादा घराण्यातील विशाल पाटील आणि स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील याही उमेदवारीच्या शर्यतीत असणार. तथापि, शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षांतर्गत बाजू भक्कम करीत असताना विरोधी गोटातील नाराजांनाही सोबत घेण्याचा मनसुबा असल्याचे संकेत दिले.
हेही वाचा… “ना संप होईल, ना बंगालचं विभाजन”, आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा इशारा!
विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीत भाजप आणि काँग्रेस अशीच लढत झाली होती. २०१४ च्या लढतीत गाडगीळ यांनी एकहाती मते मिळवत काँग्रेसला पराभूत केले. त्यावेळी भाजपला राष्ट्रवादीची अंतर्गत मदत होती ही बाब लपून राहिली नाही. मात्र, २०१९ मध्ये राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसला मदत केली. यामुळे मताधिक्यान घट येउन केवळ सात हजार मतांनी गाडगीळ निवडून आले. दोन्ही निवडणुकीचा अनुभव लक्षात घेउन काँग्रेसची सांगलीमध्ये वाटचाल सुरू आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी काँग्रेसचे आंदोलन असो वा पक्षाचा कोेणताही कार्यक्रम असो शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने पृथ्वीराज पाटील यांचा अग्रभागी सहभाग असतो हे आता सामान्य कार्यकर्तेही जाणून आहेत.
हेही वाचा… कोकण दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची नव्याने राजकीय फेरजुळणी
आघाडीत सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच हक्क राहणार असे दिसत असले तरी राष्ट्रवादीही या जागेसाठी प्रयत्नशील आहे, राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांच्यासाठी उमेदवारीची मागणी करून चाचपणी करण्यात आली होती, हेही विसरून चालणार नाही. सध्या हा विषय बासनात असला तरी कधीही डोके वर काढू शकतो. मात्र काँग्रेस अंतर्गतही उमदेवारीसाठी मोठी चुरस असणार आहे. स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहतील, सध्या ते प्रदेश समितीचे उपाध्यक्ष असले तरी त्या पदावर ते फारसे समाधानी नाहीत. यातूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या सातत्याने उठत असतात. मात्र, भाजपची उमेदवारी दिल्ली की मुंबईसाठी यावर भाजप प्रवेशाचे घोडे अडले असल्याचे सांगितले जाते. या वावड्या आहेत, तथ्य नाही हे सांगण्यासही विशाल पाटील कधी पुढे आलेले नाहीत हेही एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
हेही वाचा… आमदार प्रकाश आवाडे यांची भाजपाशी सलगी; प्रवेश कधी ?
महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीची सत्ता आहे. महापौर व उपमहापौर पद आघाडीकडे आहे. आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ अधिक असताना महापौर पद राष्ट्रवादीकडे याचे शल्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना सातत्याने बोचत असते. मात्र सत्तेची फळे केवळ राष्ट्रवादीमुळेच मिळाल्याची जाणीवही आहे. यामुळेच आघाडीचा महापालिकेतील संसार सुखानैव सुरू आहे.