दिगंबर शिंदे

सांगली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी प्रस्थापितांची ताकद अबाधित असल्याचे सांगत असतानाच ‘तुम्ही म्हणाल तेच नेतृत्व यापुढे स्वीकारले जाणार नाही’ असा कौल दिला आहे. विधानसभा मतदार संघाचे आपले गड कायम ठेवत असतानाच नेत्यांनी आत्मपरिक्षण करायला हवे असा संदेश या निवडणुकीने दिला आहे. राष्ट्रवादी अव्वल ठरली असली तरी भाजपचे यशही दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, काँग्रेसने पलूस-कडेगाव व जत हे तालुके वगळता अधोगतीकडे आपला प्रवास कायम असल्याचेच दिसून आले. काँग्रेसमध्ये अद्याप वजनदार नेते असतानाही जनमानसात नवे नेतृत्व उदयाला येउच नये ही रणनीती पक्षाच्या अधोगतीला कारणीभूत ठरू पाहत आहे.

jitendra awhad talk on Constitution, jitendra awhad on Amit Shah, Amit Shah, jitendra awhad latest news,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन – जितेंद्र आव्हाड
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Conflict in Mahayuti over post of Guardian Minister of Raigad aditi tatkare bharat gogawale
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष
Will BJP win in Delhi this year Is the election challenging for AAP
दिल्लीत यंदा भाजपची बाजी? ‘आप’साठी निवडणूक आव्हानात्मक का?
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा आज भाजप, राष्ट्रवादी करीत असले तरी गावपातळीवरील राजकारण हे गटातटाचे, गावकी-भावकीचेच अधिक असते. यातूनच एक गट या पक्षात तर दुसरा गट दुसर्‍या पक्षात अशी राजकीय सोय असते. यातूनच ग्रामपंचायत, विकास सोसायटीच्या निवडणुका चुरशीने लढविल्या जातात. यावेळी थेट सरपंच निवड मतदारामधून होणार असल्याने लोकांचा कल समजून येण्यास चांगली मदत होणार असल्याने आमदार, खासदारांनी जातीने लक्ष घातले होते. काही ठिकाणी एकाच पक्षातील लोकही राजकीय युध्दासाठी एकमेकासमोर उभे ठाकले होते. विशेषत: वाळवा तालुययात राष्ट्रवादी अंतर्गत दोन पॅनेल मैदानात उतरल्याने वरिष्ठ नेतृत्वाने फारसे लक्ष घातले नाही. याचा फटका राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या कुरळप गावामध्ये आणि महानंदाचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या ताकारीमध्ये बसला. या ठिकाणी गेली चार दशके एकहाती असलेली सत्ता अन्य गटाकडे गेली. तालुययात भाजपनेही आपले स्थान मजबूत करीत आगामी विधानसभा व पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पेठमध्ये महाडिक गटाला शह मिळाला असला तरी वाळवा तालुक्यात जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांनी अनेक गावात आपली ताकद दाखवली आहे.

हेही वाचा: बंडानंतरही रायगडात ठाकरे गटाचे अस्तित्व टिकून

वाळव्याच्या तुलनेत शिराळ्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या मदतीने वर्चस्व कायम राखले आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचेही नवे नेतृत्व या निवडणुकीमध्ये पुढे आले आहे. कारखान्याचे संचालक झाल्यानंतर विराज उद्योग समूहाचा कारभार पाहात असतानाच त्यांनी राजकीय घोडदौडही सुरू केली आहे. मात्र, भाजपने सम्राट महाडिक आणि सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे ताजा निकालावरून दिसून आले. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांनी आपले चिकुर्डे गाव ताब्यात घेतले असून नेतृत्वाच्या शर्यतीत ते आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करतील असे दिसते.

हेही वाचा: दिव्या ढोले : कॉर्पोरेट क्षेत्रातून राजकारणाकडे

खानापूरमध्ये ग्रामीण भागात अद्याप आपलीच ताकद अबाधित आहे हे बाळासाहेबांची शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी सिध्द केले. ग्रामीण भाग अद्याप बाबर गटापासून दूर गेला नसल्याचेच दिसून आले. विटा शहरावर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे वर्चस्व असल्याने विटा नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी बाबर गटाचे स्वप्न आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, वैभव पाटील यांचा शहरात बोलबाला असल्याने बाबर गटाला नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. आटपाडीमध्ये भाजपचे आ. गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचे गट ताकदवान असून त्यांना शह देण्याच्या प्रयत्न जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे.

जतमध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना वेढण्याचे प्रयत्न भाजपचे असून यासाठी राष्ट्रवादीची ताकदही काँगेस विरोधात वापरली जात आहे. आमदार सावंत यांच्या गटाचा खुद्द त्यांच्या गावातच पराभव करून विरोधकांनी पुढील निवडणुका सोप्या असणार नाहीत याची चुणूक दाखवली आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा प्रबळ असल्याचे दिसून आले असले तरी खासदार गटाचा कवठेमहांकाळमधील प्रवेश राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारा ठरू शकतो. भावी आमदार म्हणून रोहित पाटील यांचे नाव जरी घेतले जात असले तरी त्यांनी सल्लागाराच्या कोंड्याळताच अडकवून घेतले असल्याने कवठेमहांकाळ नगरपंचायतीत फटका बसला. खासदार गटाशी अंतर्गत असलेले साटेलोटे संपुष्टात आल्याचे दिसत असले तरी अजितराव घोरपडे गटाला शह देण्यासाठी भविष्यात काहीही घडू शकते.

माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी पलूस-कडेगाव मध्ये आपले वर्चस्व राखत असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाला शह देत आपले मतदार संघावर लक्ष असल्याचेच दाखवून दिले. देशमुख गटाला मात्र, या निवडणुकीने आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे. कुंडलच्या मर्यादित क्षेत्रात राष्ट्रवादीच्या आमदार. अरूण लाड यांनी आपला गड शाबूत राखला असला तरी पक्ष विस्तारासाठी विशाल होण्याची गरज अधोरेखित झाली. मिरज तालुययाच्या पूर्व भागात पालकमंत्री सुरेश खाडे यांची ताकद अबाधित असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. मात्र, राष्ट्रवादीने या ठिकाणी मोर्चेबांधणी केली तर पंचायत समितीमध्ये प्रबळ दावेदार होउ शकतो. यासाठी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे यांच्या नेतृत्वाला पक्षाकडून अधिक ताकद मिळण्याची गरज आहे.

हेही वाचा: शिवसेना फुटीनंतर नाशिकमध्ये उणीधुणी काढण्याची स्पर्धाच लागली

ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या नसल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे अस्पष्ट आहे. तरीसुध्दा भाजप आणि राष्ट्रवादी सर्वाधिक जागा पटकावल्याचा दावा करीत आहेत. हा दावा करण्याची ताकदही आता काँग्रेसमध्ये उरलेली नाही. यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत काँग्र्रेसची फरपट निश्‍चित आहे.

Story img Loader