लातूर : महाविकास आघाडीचे सरकार बनण्यापूर्वी गायब असणाऱ्या एका आमदाराचा शोध जेव्हा सुरू होता तेव्हा चर्चेत आलेलं नाव होतं, संजय बनसोडे. शिवसैनिकांनी त्यांना शोधून काढले होते. पुढे उदगीरचे आमदार संजय बनसोडे राज्यमंत्री झाले आणि कायम दादानिष्ठ अशी ओळख जपत त्यांनी केलेल्या राजकारणामुळे त्यांना पुन्हा नव्याने मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. दादानिष्ठ असल्याचे बक्षीस त्यांना पुन्हा मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय बनसोडे यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसपासून झालेली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर युवक राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी कामाची सुरुवात केली. अजित पवार यांचे ते निष्ठावान पाईक म्हणून ओळखले जात होते. सतत लोकांच्या संपर्कात राहणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, पराभवानंतर खचून न जाता त्यांनी मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवला परिणामी २०१९ च्या निवडणुकीत ते चांगल्या मताने निवडून आले.

हेही वाचा – दिल्लीतील बैठकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर शिक्कामोर्तब

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदा संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये सतत संपर्क ठेवला. राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष देऊन आपले वर्तन ठेवणारा अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत असले तरी भाजप, संघ परिवारातील मंडळींशी चांगला संपर्क असणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay bansode got the ministership again because of his loyalty to ajit pawar print politics news ssb
Show comments