सुहास सरदेशमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मनात कालवाकालव झाली. कमालीचं नातं होतं त्यांच्याबरोबर. गप्पाही मारायचो संधी मिळेल तेव्हा. पण पुढे ‘मातोश्री’ बदलत गेली. संवाद होऊ नये अशी रचनाच उभी राहिली. पाच मिनिटे मिळतील का असे विचारल्यावर पक्षप्रमुख वेळ द्यायला तयार असायचे. पण ती मिळायची मात्र नाही. मधली माणसं वेळ मिळू देत नव्हती. त्यांनी चुकीच्या मार्गाने उद्धव ठाकरे यांना नेले. ‘मातोश्री’ बदलत गेली आणि आता हे सारे घडले आहे, असे मत शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.
शिवसेनेतील सत्तास्पर्धा आता मदतकार्यातदेखील टोकाला
मतदारसंघात परतल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांच्या समवेत युवासेनेचे राजेंद्र जंजाळ यांच्यासह काही पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. आता शिरसाट यांनीही मंत्रीपदासाठी हालचाली करायला सुरुवात केली आहे. दरम्यान शिंदे- फडणवीस सरकारची जडणघडण आणि भूमिका याविषयी बोलताना शिवसेनेतील बदलही त्यांनी विशद केले. ’शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना भेटण्यासाठी गावागावातील लोक येत. एकदा तर १०-१२ वर्षाचा मुलगा उस्मानाबादहून भेटायला आला होता. त्याला जेवलास का रे बाबा, गावी परत जायला पैसे आहेत का, हेही बाळासाहेबांनी विचारले. त्याला बाळासाहेबांना भेटल्याचा कमालीचा आनंद होता. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, ही माणसंच आपली संपत्ती आहे.’ अशी आठवण सांगत शिरसाट यांनी सांगितली. पण पुढे साधी माणसं भेटू शकली नाहीत. जेथे आमदारांना भेटण्यासाठी वेळ मिळत नसे, तिथे बाकीच्यांचे काय. उद्धव ठाकरे यांना चुकीच्या दिशेने नेण्यात आले. त्यात संजय राऊत सारख्या प्रवक्त्यांनी दरी वाढवली. त्यांना आता नशा आहे, माध्यमांमध्ये झळकण्याची. काही व्यक्तींनी शिवसेना पक्ष प्रमुखांना भेटूच दिले नाही. त्यामुळे संवाद संपत गेला.
पुण्यात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर!
आता संवादाची भाषाही बदलली. जेथे महिलांना सन्मान होता, अगदी मातोश्रीवर आल्यावर ज्यांची ओटी भरली जायची, ती पद्धतच बंद पडली. आता आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना रेडे असे संबोधले जाते. एवढेच नाही तर वेश्या असाही शब्दप्रयोग केला गेला. गुवाहटीमध्ये असताना त्या वक्तव्यावरून शिंदे गटात सहभागी झालेल्या महिला आमदाराच्या डोळ्यात पाणी आले. एका बाजूला हकालपट्टीची बातमी सोडायची आणि दुसरीकडे चर्चेला या म्हणायचे अशी तेव्हाची कार्यपद्धती होती. मिलिंद नार्वेकर चर्चेला आले होते, तेव्हा यावर चर्चाही झाली. ही कार्यपद्धती कोणालाही पटणारी नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर असूनही परतीचे मार्ग बंद होत गेले, असेही आमदार शिरसाट म्हणाले. आता आम्हीच शिवसेना आहोत. त्यामुळे आता पक्षप्रमुख शाखा प्रमुखांपर्यंत बोलत आहेत. त्यांना शिवसैनिकांची आठवण झाली हे चांगलेच झाले. नांदेड येथील एका महिलेला २२ वर्षानंतर ‘मातोश्री’ हून दूरध्वनी गेला. असे काही घडले नसते तर या महिला कार्यकर्तीला कोण विचारले असते ? मातोश्रीमधील वर्तन बदल हेही बंडखोरीमागचे एक कारण आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसने कशा पद्धतीने शिवसेनेला फोडले हे पक्षप्रमुखांना कळले नाही. भाजपबरोबर जाण्याचा निर्णय आधीच घेतला असता तर बरे झाले असते. पण तसे झाले नाही, असेही सांगत शिरसाट यांनी मातोश्रीवरील बदल उलगडून दाखविले.