मुंबई : दादर-माहीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी काढण्यात आलेल्या प्रचारफेरीमध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेही सहभागी झाले होते. ही प्रचारफेरी शिवसेना भवनसमोर आल्यावर श्रीकांत शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
दादर- माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, अशी भूमिका भाजपने सुरुवातीपासूनच घेतली होती. यावरून शिंदे गट व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खटकेही उडाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदा सरवणकर हे राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी भेटण्यास गेले होते. पण राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सरवणकर यांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>>Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?
सरवणकर यांच्या प्रचारफेरीत खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे सहभागी झाले होते. शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने गर्दी केली होती. आपापल्या पक्षाचे झेंडे हाती घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. भाजपचेही कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते, मात्र भाजपचे प्रमुख नेते व पदाधिकारी अनुपस्थित होते.