शहरातील भेदभाव रोखण्यासाठी भेदभाव विरोधी कायद्यात ‘जाती’चा समावेश करणारे विधेयक अमेरिकेतील सीएटल सिटी काऊन्सिलने अलीकडेच संमत केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने सीएटल सिटी काऊन्सिलच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अमेरिकेत हिंदूंच्या मनात भीती उत्पन्न करणाऱ्या `हिंदूफोबिया’ ला प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोप पांचजन्यच्या संपादकीयमध्ये करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भेदभाव विरोधी कायद्याचा आधार घेत हिंदूंना केलं जातंय लक्ष्य

‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी संपादकीय लेखात सीएटल सिटी काऊन्सिलने घेतलेल्या या निर्णयावर सविस्तर भाष्य केले आहे. भेदभावविरोधी कायद्यात जातीचा समावेश करण्यामागे भारतीयांच्या प्रतिभेला वाव मिळू न देण्याचा हेतू आहे, असा आरोप हितेश शंकर यांनी केला आहे. “जातविरोधी ठराव मंजूर झाल्यामळे अमेरिकेत वेगवेगळ्या संस्थात्मक स्तरावर ‘हिंदूफोबिया’ला प्रोत्साहन दिले जात आहे, हे सिद्धच झाले आहे. भेदभाव विरोधी कायद्याचा आधार घेत हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. अमेरिका तसेच इतर देशांतील हिंदूशी भेदभाव करण्याचे एक साधन म्हणून या कायद्याचा वापर केला जातो आहे. अमेरिकेत हिंदूंचे प्रमाण कमी आहे. या ठरावाच्या माध्यमातून हिंदूमागे चौकशांचा ससेमिरा लावला जाणार आहे,” असे शंकर यांनी म्हटले आहे.

म्हणूनच अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत

हावर्ड, ऑक्सफर्ड यासारख्या विद्यापीठांमध्ये ‘हिंदूफोबिया’ला प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा या लेखात करण्यात आला आहे. भारतातील आयआयटीसारख्या संस्थांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी सध्या जगात वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पदावर आहेत. आता याच विद्यार्थ्यांवर जातीवाद आणि वंशवादाचा आरोप केला जात आहे. या विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांच्यातील गुणवत्ता दाखवण्याऐवजी स्वत:चा बचाव करण्यावर केंद्रीत व्हावे, म्हणूनच अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, असेही या लेखात म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seattle anti caste move resolution rss panchjanya raise concerns hinduphobia prd