संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीला चार ते पाच महिन्यांचा कालावधी असताना धर्मनिरपेक्ष जनता दलाने ९३ उमेदवारांच्या पहिल्या यादीत नेतेमंडळींच्या मुलांना प्राधान्य दिले आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पूत्र व नातू यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या पुत्राची पत्नी निवडणूक लढण्यास इच्छूक असून, जनता दल म्हणजे देवेगौडा कुटुंबिय, असेच सारे चित्र दिसते.

देवेगौडा यांचे पूत्र व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी हे पुन्हा लढणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे पूत्र निखिल यांनाही उमदेवारी देण्यात आली. गेल्या लोकसभा निवडणुकीत निखिल मंड्या मतदारसंघातून पराभूत झाले होते. आता त्यांना विधानसभेला उभे करून लोकप्रतिनिधीपदाची त्यांची हौस पूर्ण केली जाईल. निखिल यांना उमेदवारी जाहीर झाली त्या मतदारसंघाचे सध्या प्रतिनिधीत्व त्यांची आई करीत आहे. यामुळे मुलासाठी आईने त्याग केला असावा. पण देवेगौडा यांचे दुसरे पूत्र व माजी मंत्री रेवण्णा यांची पत्नी निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे. रेवण्णा यांचे पूत्र लोकसभेत खासदार आहेत.

हेही वाचा: सांगलीत प्रस्थापितांचेच वर्चस्व अबाधित

एकूणच देवेगौडा यांचे पूत्र, नातू, सून असे सारे कुटुंबियच निवडणूक रिंगणात उतरणार आहे. आपल्या नातवासाठी देवेगौडा यांनी पारंपारिक हसन मतदारसंघाऐवजी तुमकूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. परंतु स्वत: देवेगौडाच पराभूत झाले. नातवासाठी माजी पंतप्रधानांवर पराभवाची नामुष्की आली.

हेही वाचा: बंडानंतरही रायगडात ठाकरे गटाचे अस्तित्व टिकून

जनता दलाच्या पहिल्या यादीत देवेगौडा कुटुंबियांबरोबरच पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते जी. टी. देवेगौडा आणि त्यांचे पूत्र, माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम आणि त्यांचे पूत्र असे नेते व त्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे. हसन या देवेगौडा यांच्या पारंपारिक मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secular janata party nominates son and grandson former pm devegowda for karnataka elections print politics news tmb 01