नांदेड : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या समर्थकांचे अखेर ठरले. भाजपाकडून सतत झालेल्या उपेक्षेबद्दल वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत खतगावकर यांनी पुन्हा स्वगृही जावे आणि काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात उभारी द्यावी, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेला प्रस्ताव मान्य करण्याचा ठराव शंकरनगर येथील मेळाव्यात करण्यात आला.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती, उर्वरित मतदारसंघाबाबत चर्चा सुरु – बाळासाहेब थोरात

Mahakumbh 2025
Mahakumbh 2025 : महाकुंभचे निमित्त साधत विहिंपच्या बैठका, मंदिरांवरील सरकारी नियंत्रण हटवणे व मशिदींवरील दाव्यांबाबत मोर्चेबांधणी
Image If Eknath Shinde And Narendra Modi.
Delhi Assembly Election : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिल्लीत…
BJP and AAP clash over Purvanchali community
Shehzad Poonawalla: भाजपा प्रवक्त्याची जाहीर शिवीगाळ; दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे भाजपानं माफी मागण्यास भाग पाडलं
Maha Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ८००० विद्यार्थ्यांना घडवणार ‘कुंभ दर्शन’, नेमका उद्देश काय?
अमित शाह आणि शरद पवार एकमेकांना का लक्ष्य करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : अमित शाह आणि शरद पवार एकमेकांना का लक्ष्य करत आहेत?
ajit pawar NCP nanded Pratap Patil Chikhlikar
नांदेडमध्ये पुन्हा घाऊक पक्षांतर
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?

भास्करराव खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास जि.प. चे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, बाळासाहेब पाटील कवळे, डॉ. मीनल पाटील खतगावकर, भीमराव जेठे, माधवराव सुगावकर, प्रताप पाटील जिगळेकर, गणपतराव धुपेकर, सरजीतसिंघ गिल, मसूद देसाई आळंदीकर, मंगल देशमुख, बी.पी.नरोड, राजू गंदीगुडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील काही दिवसांपासून खतगावकर आणि जिल्ह्यातील दोन माजी आमदारांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. खतगावकरांनी भाजपा सोडू नये, असा प्रयत्न खा. अशोक चव्हाण यांनी चालवला होता तर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी खतगावकरांना काँग्रेस पक्षप्रवेशाचा प्रस्ताव कळविला होता. या पार्श्वभूमीवर शंकरनगर येथे नायगाव, उमरी, धर्माबाद तसेच बिलोली, देगलूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पार पडला. त्यात खतगावकर गटाच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. तथापि, त्यांच्यासोबत राहणारे ओमप्रकाश पोकर्णा व अविनाश घाटे हे दोन माजी आमदार मेळाव्यास हजर नव्हते.

Story img Loader