अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक सोहळा २२ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे. सोहळ्यासाठी साधू-मुनींसह व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रणे पाठवली जात आहेत. इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता पीव्ही सिंधू आणि माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि उद्योग, क्रीडा विश्वातील यांसारख्या विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूर्ती हे अयोध्या समारंभासाठी उद्योग जगतातील दिग्गजांच्या पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट आहेत, ज्यात मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदाणी, रतन टाटा, टाटा समूहाचे नटराजन चंद्रशेखरन आणि L&T समूहाचे SN सुब्रह्मण्यम यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सर्वांनी संमती दिल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः ठाकरे गटाला शह देण्यासाठी परभणीत महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वंतत्र मोर्चेबांधणी

या यादीत मूर्तींचा समावेश महत्त्वाचा आहे, कारण संघ परिवारातील काही जणांनी मूर्तींवर गंभीर आरोप केले होते. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघटनेचे ‘मुखपत्र’ मानल्या जाणाऱ्या ‘पांचजन्य’मधील लेखापासून स्वतःला दूर ठेवले आहे, ज्यामध्ये देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसला लक्ष्य करण्यात आले होते. पांचजन्यमध्ये इन्फोसिससंदर्भात चार पानांची कव्हर स्टोरी प्रकाशित झाली होती. यामध्ये इन्फोसिसवर अनेक आरोप करण्याबरोबरच ‘आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत’ असेही म्हटले आहे. इन्फोसिसकडून या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. “इन्फोसिसच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती भारताच्या आर्थिक हितांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत का?” असे या कव्हर स्टोरीतून विचारणा करण्यात आली होती.

हेही वाचाः ठाकरे गटासमोर जागा राखण्याचे कडवे आव्हान तर भाजपनेही कंबर कसली

पांचजन्यमधील या लेखात इन्फोसिसवर यापूर्वी “नक्षलवादी, डावे आणि तुकडे तुकडे टोळीला मदत केल्याचा” आरोप करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप सिद्ध करणारे पुरावे त्यांच्याकडे नाहीत, असेही लेखात नमूद केले आहे. पांचजन्यच्या लेखात इन्फोसिसने इन्कम टॅक्स भरण्यासाठी तयार केलेल्या नवीन वेबसाइटमध्ये तांत्रिक अडचणींबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हा लेख समोर येताच वाद सुरू झाला होता आणि त्यात व्यक्त केलेल्या मतांशी संघ सहमत आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले गेले होते. हा वाद अधिकच चिघळत असल्याचे पाहून आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी ट्विट करून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘पांचजन्य’ हे संघाचे मुखपत्र नाही. “पांचजन्य हे आरएसएसचे मुखपत्र नाही आणि या लेखात व्यक्त केलेली मते आरएसएसशी जोडली जाऊ नयेत. ही लेखकाची मते आहेत, आमच्या संघटनेची नाहीत.”

मूर्तींच्या कंपनीत बंगालमधील मार्क्सवादी महत्त्वाच्या पदांवर असल्याचा दावाही केला होता आणि अशा परिस्थितीत चीन आणि ISIच्या प्रभावाचा धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोपही करण्यात आला होता. खरं तर पांचजन्यचा हा लेख अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला, कारण काही महिन्यांपूर्वीच इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा या नात्याने सुधा मूर्ती यांनी कोविड समस्येवर आरएसएसच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते.

गेल्या वर्षी मोदी सरकारने सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. उल्लेखनीय म्हणजे मूर्ती यांची मुलगी अक्षता हिचे लग्न ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झाले आहे. भालाफेक चॅम्पियन चोप्रा सध्या दक्षिण आफ्रिकेत प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे. सिंधू आणि प्रसाद राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे देशातील क्रिकेटचे आयकॉनदेखील या कार्यक्रमासाठी आमंत्रित आहेत.

कार्यक्रमाच्या अतिथींच्या यादीमध्ये विविध व्यवसायातील लोकांचा समावेश आहे. राजकारणी आणि माजी नोकरशहांपासून ते चित्रपट तारका, कलाकार, उद्योगपती आणि क्रीडा व्यक्तिमत्त्वांपर्यंत यात विविध क्षेत्रातील २ हजारांहून अधिक प्रमुख चेहरे समाविष्ट आहेत. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी, लालू यादव, नितीश कुमार, सीताराम येचुरी आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या प्रमुख विरोधी नेत्यांसह सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र निमंत्रित करण्याव्यतिरिक्त ट्रस्टने अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना आमंत्रित केले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, ऋषभ शेट्टी, मधुर भांडारकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, सनी देओल, प्रभास, आयुष्मान खुराना, अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया टोपीवाला (ज्याने १९८७ च्या रामायण टीव्ही मालिकेत राम आणि सीतेची भूमिका केली होती) आणि गीतकार प्रसून जोशी यांचा समावेश आहे. याशिवाय चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे संचालक नीलेश देसाई, सीबीआरआयचे शास्त्रज्ञ देबी दत्ता आणि दलाई लामा, माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव आणि जग्गी वासुदेव यांसारखे आध्यात्मिक नेते निमंत्रितांमध्ये आहेत.