गुजरात विधानसभा निवडणुकीत जवळपास सात उमेदवार अब्जाधीश असल्याचे समोर आले आहे. यातील पाच भाजपाचे उमेदवार आहेत. २०१७ मध्येही सात अब्जाधीश उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१२ मध्ये दोन अब्जाधीशांनी निवडणुकीत नशीब आजमावल्यानंतर २०२२ पर्यंत या यादीत वाढ झाली आहे. गांधीनगरच्या मनसा शहरातून काँग्रेसविरोधात निवडणूक लढवणारे भाजपा उमेदवार जयंती पटेल यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्थावर आणि जंगम मालमत्ता तब्बल ६६१.२८ कोटी असल्याचे घोषित केले आहे. कडवा पाटिदार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पटेल यांच्याकडे १४७ कोटींची जंगम तर ५१४ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. २३३ कोटींची देणी असल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमुद केलं आहे.
Gujarat Election 2022: निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरांना भाजपाचा दणका, आणखी १२ जणांवर निलंबनाची कारवाई
काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले ६१ वर्षीय बलवंतसिंह राजपूत पाटण जिल्ह्यातील सिधपूरमधून निवडणूक लढवत आहेत. ‘गोकुळ’ समूहाचे मालक असलेले राजपूत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ३६७.८९ कोटींची संपत्ती असल्याचे नमुद केले आहे. राजपूत यांच्याकडे २६६ कोटींची जंगम तर १०१ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पाटणमधील रिधानपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे बिल्डर रघुनाथ देसाई यांनी १४० कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे ६.१६ कोटींची जंगम तर १३४.४४ कोटी स्थावर मालमत्ता आहे. ३.२५ कोटींची देणी असल्याचंही त्यांनी घोषित केलं आहे.
राजकोट जिल्ह्यातून दोन अब्जाधीश निवडणूक लढवत आहेत. राजकोट दक्षिणमधून भाजपाचे रमेश तिलाला तर राजकोट पूर्वमधून काँग्रेसचे इंद्रनील राज्यगुरु निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५७ वर्षीय उद्योगपती तिलाला लेउवा पटेल जातीच्या ‘श्री खोडलधाम ट्रस्ट’चे विश्वस्त आहेत. त्यांच्याकडे पत्नीसह एकूण १७२ कोटींची संपत्ती आहे. कमी वयात शाळात सोडल्यानंतर त्यांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करत या क्षेत्रात यश प्राप्त केलं आहे.
काँग्रेसच्या इंद्रनिल राज्यगुरु यांच्याकडे एकूण १६० कोटींची संपत्ती आहे. यात जंगम ६६.८५ कोटी तर स्थावर ९२.९९ कोटी संपत्तीचा समावेश आहे. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या जंगम मालमत्तेत १६ वाहनांचा समावेश आहे. एक बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाईक, ऑडी कार, एक सामान्य जीप, ट्रॅक्टर, लँड रोव्हर आणि फोक्सवॅगन बीटल गाडी असल्याची नोंद निवडणूक प्रतिज्ञापत्रात राज्यगुरु यांनी केली आहे.
२०१७ साली निवडणूक जिंकून आमदार झालेले भाजपाचे पबुभा मानेक यांच्याकडे एकूण ११५ कोटींची संपत्ती आहे. ते द्वारकामधून निवडणूक लढवत आहेत. २०१२ मध्ये मानेक यांची संपत्ती ३१.६६ कोटी होती. त्यात आता गेल्या १० वर्षांमध्ये चौपट वाढ झाली आहे. मानवदरमधून भाजपा उमेदवार जवाहर चावडा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण १३० कोटींच्या संपत्तीचे तपशील नमुद केले आहेत. त्यांच्याकडे २५.४९ कोटींची जंगम तर १०४.६६ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.