पंढरपूर : ‘‘एकीकडे अमेरिका, इंग्लंड, युरोप खंडात मतदान मतपेटीद्वारे होते. मात्र आपल्याकडे ‘ईव्हीएम’द्वारे का? आमच्याकडे शंका निर्माण होत आहेत. निवडणूक यंत्रणेबद्दलचा गैरविश्वास दूर करण्याची आमची भूमिका आहे. यात राजकारण यत्किंचीतही आणायचे नाही,’’ असे प्रतिपादन शरद पवार यांनी रविवारी केले.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव ईव्हीएमविरोधी म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या गावाला शरद पवारांनी भेट दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विद्या चव्हाण, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर आदी उपस्थित होते. मारकडवाडी गावात शरद पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम मतदानावर आक्षेप घेतला, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोस्टल मतदानाबाबत आकडेवारी सांगून नवीन मुद्दा उपस्थित केला.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

हेही वाचा >>>आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार

पोस्टल मतदानात भाजपा, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांना कमी जागेवर आघाडी मिळाली आणि जास्त जागा जिंकल्या, तर या उलट महाविकास आघाडीला पोस्टल मतदानात जास्त जागेवर आघाडी मिळाली मात्र कमी जागा जिंकल्या असे सांगत पुन्हा जुन्या पद्धतीचे मतदान घ्या, अशी मागणी पाटील यांनी केली. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीदेखील आपल्या मनोगतात ईव्हीएमचा विरोध केला. त्या नंतर शरद पवारांनी आपल्या भाषणातून सरकारवर टीका केली. तुमच्या गावात जमावबंदी का लागू केली, तुमच्या समाधानासाठी तुम्ही पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेतला त्याला बंदी कशी, असे सवाल उपस्थित करत पवारांनी याबाबत गावकऱ्यांना सर्व कागदपत्रे मला द्या, असे सांगितले. या वेळी ‘ईव्हीएम’बाबत ग्रामस्थ व महिलांनी भाषणातून कडाडून विरोध केला.

हेही वाचा >>>शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट

आम्हाला ईव्हीएमने मतदान नको. आम्हाला जुन्या पद्धतीने मतदान पाहिजे. शक्य असेल तर तालुक्यातील सर्व गावांत ठराव करा, त्या ठरावाची प्रत आम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान, निवडणूक आयोगाकडे देऊ असे पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, जर पुन्हा मतदान झाले तर भाजपला जास्त मते मिळतील, असा दावा भाजपचे राम सातपुते यांनी केला.

Story img Loader