अलोक देशपांडे

नांदेड : लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळविला त्यामागे जनोपयोगी योजनांचा प्रभाव होता, हे मान्य करतानाच महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा असून २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’सोबत केलेल्या चर्चेदरम्यान केला.

Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

दरम्यान, गेल्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण बहुमताचे लक्ष्य निश्चित केले होते तथापि, संविधान बदलण्याच्या मुद्द्यामुळे त्यांचे नुकसान झाले. विशेषत: दुर्बळ घटकाने अल्पसंख्याकांबाबत मोदींचा दृष्टिकोनच नाकारला. निकालानंतर बहुमत न मिळाल्याने मोदी यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावे लागले. महाराष्ट्रातही विरोधकांनी सर्वाधिक जागा जिंकल्या हे मोदी आणि त्यांच्या धोरणांवर जनता नाराज असल्याचे द्याोतक असून हीच सध्याच्या विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याचे पवार म्हणाले.

जनतेला बदल हवा आहेच आणि हीच भावना कायम राहिली तर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. दुसरे आघाडीतील आमचा पक्ष, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २८८ जागांपैकी १०-११ जागा वगळता समन्वयाने काम करीत आहेत, असे पवार म्हणाले.

हेही वाचा >>>Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

ज्याला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री’

मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करण्याच्या मुद्द्यावर बोलताना एकही नाव अंतिम न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले. निवडणुकीनंतर बहुमत मिळाले तर आमच्या घटक पक्षांपैकी ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तोच मुख्यमंत्री ठरवेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोधकांना फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने सर्व यंत्रणांचा वापर करून ‘लाडकी बहीण’सारखी पैसे देणारी योजना आणली व वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. या योजनेचा काही परिणाम शक्य आहे. तथापि, हे सरकार एका हाताने पैसे देत आहे आणि दुसऱ्या हाताने खिशातून काढून घेत आहे, कारण प्रत्येक वस्तूचे दर खूप वाढले असल्याची सर्वसाधारण भावना आहे. याशिवाय शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना पैसे दिले जात असून याद्वारे सरकार वेगवेगळ्या घटकांना लक्ष्य करीत आहे.शरद पवारअध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस