अलोक देशपांडे
नांदेड : लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळविला त्यामागे जनोपयोगी योजनांचा प्रभाव होता, हे मान्य करतानाच महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा असून २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’सोबत केलेल्या चर्चेदरम्यान केला.
दरम्यान, गेल्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण बहुमताचे लक्ष्य निश्चित केले होते तथापि, संविधान बदलण्याच्या मुद्द्यामुळे त्यांचे नुकसान झाले. विशेषत: दुर्बळ घटकाने अल्पसंख्याकांबाबत मोदींचा दृष्टिकोनच नाकारला. निकालानंतर बहुमत न मिळाल्याने मोदी यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावे लागले. महाराष्ट्रातही विरोधकांनी सर्वाधिक जागा जिंकल्या हे मोदी आणि त्यांच्या धोरणांवर जनता नाराज असल्याचे द्याोतक असून हीच सध्याच्या विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याचे पवार म्हणाले.
जनतेला बदल हवा आहेच आणि हीच भावना कायम राहिली तर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. दुसरे आघाडीतील आमचा पक्ष, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २८८ जागांपैकी १०-११ जागा वगळता समन्वयाने काम करीत आहेत, असे पवार म्हणाले.
‘ज्याला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री’
मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करण्याच्या मुद्द्यावर बोलताना एकही नाव अंतिम न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले. निवडणुकीनंतर बहुमत मिळाले तर आमच्या घटक पक्षांपैकी ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तोच मुख्यमंत्री ठरवेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोधकांना फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने सर्व यंत्रणांचा वापर करून ‘लाडकी बहीण’सारखी पैसे देणारी योजना आणली व वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. या योजनेचा काही परिणाम शक्य आहे. तथापि, हे सरकार एका हाताने पैसे देत आहे आणि दुसऱ्या हाताने खिशातून काढून घेत आहे, कारण प्रत्येक वस्तूचे दर खूप वाढले असल्याची सर्वसाधारण भावना आहे. याशिवाय शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना पैसे दिले जात असून याद्वारे सरकार वेगवेगळ्या घटकांना लक्ष्य करीत आहे.– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस