नांदेड : पुतणे अजित पवार, पूर्वी स्वीय सचिव राहिलेले दिलीप वळसे पाटील, अत्यंत निकटवर्ती असलेले प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि अन्य अनेक सहकार्‍यांनी शरद पवार यांची साथ सोडत, ८२ व्या वर्षात त्यांना मोठा धक्का दिला. पूर्वीही काहींनी पवारांची साथ सोडली होती. जवळच्यांकडून धक्के दिले जात असले तरी एक निष्ठावान आजही थोरल्या पवारांच्या साथीला आहे. हा सहकारी गेले अनेक वर्षे पवारांची इमाने इतबारे सेवा करतो. त्याचे नाव आहे गामा आणि तो पवारांच्या गाडीचा चालक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेची विस्तारित नवी आवृत्ती अलीकडे प्रकाशित झाली. २०१५ ते २०२३ दरम्यानच्या घडामोडी आणि प्रसंगांची माहिती त्यातून समोर आली. त्यानंतर दोन महिन्यांनीच पवारांच्या पक्षात फूट पडली. या पुस्तकातल्या एका प्रकरणात पवार यांनी देश पातळीवरील काही नेते, उद्योगपती राहुल बजाज यांच्यासह आणखी एका सामान्याविषयी लिहिले आहे. हा सामान्य म्हणजेच गामा. पवारांसोबतच्या त्यांच्या सेवेची ५० वर्षे पूर्ण झाली असून निकटच्या अनेक सहकार्‍यांनी पवारांची साथ सोडली. पण गामा आजही पवारांबरोबर आहे. आजच त्यांनी मुंबई ते येवला प्र‌वास केला त्या वाहनाचे चालक हे गामाच होते.

हेही वाचा – बिहारामध्ये मंत्री-शासकीय अधिकाऱ्यातील वाद चव्हाट्यावर; नितीश कुमार, लालूप्रसाद यांना करावा लागला हस्तक्षेप!

गेल्या वर्षी शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर काही दिवसांनी मातोश्री बंगल्यातील बाळासाहेबांचा जुना सेवक थापा याचे नाव अचानक चर्चेत आले, ते त्याने शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे. वृत्तवाहिन्यांनी त्याच्या या प्रवेशाला ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये स्थान दिले, तरी शरद पवार यांच्या लाखो कि.मी. प्रवासात त्यांचा वाहनचालक आणि काळजीवाहक असलेला गामा मात्र आजही प्रसिद्धीच्या झोतात नाही. त्याचे पवारांकडील महत्त्व वरील पुस्तकाच्या एका पानातच शब्दबद्ध झालेले आहे.

हेही वाचा – समान नागरी कायद्यावरील चर्चेसाठी नागालँडचे शिष्टमंडळ अमित शाहांच्या भेटीला, १९६० सालच्या कराराचा आधार घेत केली मोठी मागणी!

सार्वजनिक जीवनात यशस्वीपणे जगताना अत्यंत जिवाभावाचे आणि विश्वासाचे सहकारी मला कायम लाभले, असे शरद पवार यांनी आत्मकथेत नमूद केले असले, तरी गेल्या आठवड्यात अनेक सहकार्‍यांनीच पक्षात घातपात घडवून आणल्यानंतर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर निघालेल्या पवारांच्या ताफ्यात इतरांसोबत गामाही आहे. पवारांच्या गाडीचा चालक म्हणून तो सेवा बजावत आहे. बारामतीमधील एक दिवंगत डॉक्टर एम.आर. शाह यांनी आपल्या गाडीचा हा चालक ५० वर्षांपूर्वी पवारांकडे सुपूर्द केला. तेव्हापासून पवारांचे चारचाकी वाहन आणि प्रवासातील सारी व्यवस्था हा चालक सांभाळत आहे. पवार यांनी त्याच्याविषयी थोडक्यात लिहिले आहे, त्यानुसार पवारांच्या प्रत्येक प्रवासात गामा एका अर्थाने त्यांचा पालकही असतो. दौर्‍यादरम्यान पवार यांचे प्रवासातील कपडे, औषधं या सर्व बाबींची जबाबदारी गामाकडे असते. गामा गाडी चालवत असताना अनेकदा विविध क्षेत्रांतील मंडळींबरोबर पवार गोपनीय चर्चा करत आले आहेत, पण या चर्चेतल्या एका शब्दाचाही गामाने कुठे बभ्रा केला नाही. दौर्‍यादरम्यान पवार यांच्या जेवणाच्या किंवा औषधांच्या वेळा पुढे-मागे झाल्या तर संबंधित पदाधिकार्‍यांना स्मरण करून द्यायलाही गामाचाच पुढाकार असतो.