पिंपरी : एके काळी पिंपरी-चिंचवड शहरावर वर्चस्व असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना राजकीय धक्के दिल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शहराच्या राजकारणावर विशेष लक्ष घातले आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांचा ओढा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वाढला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शरद पवारांची भेट घेत आहेत. पहिल्यांदाच शरद पवार स्वतः शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती घेणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हाेती. त्यामुळे शरद पवार यांच्यासह पक्षातील काेणताही नेता शहरातील राजकारणात लक्ष घालत नव्हता. महापालिका, पक्ष संघटनेतील, उमेदवारांच्या मुलाखती, उमेदवार ठरविणे, पदे देणे असे शहरातील सर्व निर्णय अजित पवार हेच घेत होते. त्यामुळे शहरातील पक्ष संघटनेवर त्यांचे वर्चस्व होते. पक्षातील फुटीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली. केवळ ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी नगरसेवक तुषार कामठे हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. पक्षफुटीनंतर शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राेहित पवार यांनी लक्ष घालत शहरात दाैरे वाढविले. कार्यकर्त्यांचे संघटन नव्याने निर्माण केले. खासदार सुळे यांनी शहरात मेळावा घेतला. आजपर्यंत शहरात लक्ष घालत नव्हते. कोणाच्या कामात ढवळाढवळ करणे मला आवडत नव्हते. पण, आता लक्ष घालणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

mahayuti ncp bjp contest pimpri chinchwad municipal elections
पिंपरी-चिंचवडसाठी महायुतीत चुरस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
necessary to remain constantly alert for disaster prevention says Sharad Pawar
आपत्ती निवारणासाठी सतत सतर्क राहणे गरजेचे – शरद पवार
Sharad Pawar on Uday Samant
Sharad Pawar: पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, “मी वाट बघतोय…”
Ramdas Athawale appeal Sharad Pawar NDA
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे – रामदास आठवले यांचे आवाहन

हे ही वाचा… पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’

लाेकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि राजकीय भवितव्याची चिंता वाढली. ही अस्वस्थता ओळखून शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली. शहरातील भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला वेळ दिली. त्यांची मते जाणून घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी समर्थक २० माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश केला. तसेच माजी आमदार विलास लांडेही शरद पवार यांच्या पक्षाच्या वाटेवर आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावित शरद पवारांची भेट घेतली. चिंचवडची जागा पक्षाला न मिळाल्यास महाविकास आघाडीत प्रवेश करण्याचा इशारा दिला. या माजी नगरसेवकांसाेबत भाजपमधील नाराजांचा एक माेठा गट आहे.

लाेकसभा निवडणुकीत तटस्थ राहिलेले आणि विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाम असलेल्या माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आणि पिंपरीतून इच्छुक असलेल्या एका माजी नगरसेविकेने शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते.

हे ही वाचा… मावळतीचे मोजमाप: शिक्षण; प्रश्नांच्या संख्येत घट, समस्या कायम

तिन्ही मतदारसंघांवर दावा

शहरात शरद पवार यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघांत पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळावेत, असा ठराव शहर संघटनेने केला आहे.

Story img Loader