राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक करतानाच त्यांच्यावर इंदिरा गांधी यांनी १९८०मध्ये कसा अन्याय केला होता हे निदर्शनास आणून दिले. एकीकडे मोदी हे पवारांचे नेहमी तोंडभरून कौतुक करीत असले तरी राज्यात मात्र केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा फास हा राष्ट्रवादीच्याच नेत्यांच्या पाशी आवळला जात असल्याचे चित्र बघायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकसाठी शाही तयारी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावरील चर्चेच्या उत्तरात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचा खास उल्लेख केला. शरद पवार यांना मी नेहमीच आदरणीय नेता मानतो, असे मोदी यांनी सांगितले. तसेच १९८० च्या दशकात ३५-४० वयोगटातील पवार यांचे सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले होते याकडे लक्ष वेधले. मोदी यांनी प्रथमच पवारांचे कौतुक केलेले नाही. पंतप्रधानपदी निवड झाल्यावर बारामती दौऱ्यात मोदी यांनी ‘मी शरद पवार यांचे बोट पकडून राजकारणात आलो’, असे विधान केले होते. मोदी व पवार यांच्यात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.
एकीकडे मोदी शरद पवारांचे कौतुक करीत असले तरी राज्यात मात्र केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर राष्ट्रवादीचेच नेते असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- हरियाणात दोन वर्षांपासूनची सर्व रिक्त पदं रद्द होणार, मनोहरलाल खट्टर सरकारचा मोठा निर्णय; विरोधक आक्रमक!

मोदी यांनी पवारांचे कौतुक केले त्याच दिवशी सक्तवसुली संचलनालयाने प्रफुल्ल पटेल यांच्या सदनिका जप्त करण्याच्या कारवाईस अपिलिय प्राधिकरणाने मान्यता दिली होती. राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतीली नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि नवाब मलिक या नेत्यांना ‘ईडी’ने अटक केली. सहकारी बँक घोटाळ्यात ‘ईडी’ने स्वत: शरद पवार यांनाच नोटीस बजाविली होती. पटेल यांची चौकशी झाली होती. सध्या पक्षाचे आणखी एक नेते हसन मुश्रीफ हे ‘ईडी’च्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी झाली.

हेही वाचा- सोलापुरात दोन्ही काँग्रेसमधील वाकयुद्धात सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढली

राज्यातील भाजपा नेत्यांनी मागणी केल्यावर ईडीची कारवाई होते, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातो. राज्यात भाजपला राष्ट्रवादीची अधिक भीती वाटत असावी, असा त्याचा अर्थ काढला जातो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar is always praised by modi yet the leader of ncp is on the radar of central agencies print politics news dpj
Show comments