Chhagan Bhujbal vs Sharad Pawar: छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन छेडून, मराठा समाजाची नाराजी ओढवून घेतली. गेल्या काही वर्षांत छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द अनेक खाचखळग्यांनी भरलेली राहिली. २६ महिने ईडीच्या कारागृहात काढल्यानंतर २०१९ साली त्यांना मंत्रिपद देण्यात आले. तसेच २०२३ साली शरद पवारांची साथ सोडून ते अजित पवार यांच्याबरोबर सत्तेत सामील झाले. त्यामुळे शरद पवार यांनीही त्यांना पराभूत करण्याची रणनीती आखली. ७७ वर्षीय छगन भुजबळ यांना येवला विधानसभेत पराभूत करण्याची तयारी शरद पवार यांनी केली असताना भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ अपराजित ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२०२३ साली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर दौरे करण्यास सुरुवात केली. या दौऱ्याची सुरुवातच त्यांनी येवला विधानसभेतून केली. त्यानंतर मंगळवारी (१२ नोव्हेंबर) शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन पुन्हा एकदा छगन भुजबळांना लक्ष्य केले. छगन भुजबळ यांनी पक्षाशी केलेल्या प्रतारणेवर शरद पवार यांनी भाषणातला महत्त्वाचा वेळ खर्ची केला. छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही दगा दिला होता. त्यामुळे अशा माणसाला निवडून द्यायचे की नाही, याचा निर्णय जनतेने घ्यावा, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.
छगन भुजबळ नाशिकच्या येवल्यात कसे आले?
मुंबईचे मनपाचे महापौर व आमदार असलेले छगन भुजबळ नाशिकमध्ये येण्याची कथाही त्यांच्या आयुष्याप्रमाणे रंगतदार आहे. मुंबईपासून अवघ्या २५० किमी अंतरावर असलेले नाशिकमधील येवला हे शहर पैठणी आणि कांदा उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र, येवला मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता. त्यामुळे येवल्यातील काही नागरिकांनी छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडणूक लढविण्याची गळ घातली. छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर नेत्यामुळे येवल्याच्या विकासाचा मार्ग खुला होईल, अशी त्यांची अपेक्षा होती.
शिवसेनेतून बाहेर पडलेले छगन भुजबळ त्यावेळी राजकीय पुनर्वसनासाठी झगडत होते. मुंबईच्या भायखळा बाजारात भाज्यांची विक्री करणारे भुजबळ त्यावेळी शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर १९९५ साली माझगाव विधानसभा मतदारसंघातून अतिशय नवख्या असलेल्या बाळा नांदगावकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९९ साली भुजबळ यांनी निवडणूक लढविली नाही. मग त्यांनी थेट २००४ साली येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि ते जिंकून आले. शरद पवारांनी त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रिपद बहाल केले.
माणिकराव शिंदे यांचे आव्हान
२००४ नंतर आता २० वर्षांनी चित्र पूर्ण पालटले आहे. यावेळी छगन भुजबळ यांच्यासमोर माणिकराव शिंदे यांचे आव्हान उभे राहिले आहे. २००४ साली भुजबळ यांना येवल्यात आणण्यात शिंदे यांचा मोलाचा वाटा राहिला होता. २००९ साली शिंदे यांनी शिवसेनेतून भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती; मात्र त्यांना पराभव सहन करावा लागला.
दरम्यान, मागच्या २० वर्षांतील कारभारामुळे भुजबळ यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी पसरली आहे. कुटुंबातील सदस्यांना महत्त्वाची पदे दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षपातीपणाची भावना निर्माण झाली आहे. भुजबळ यांचा मुलगा पंकज शेजारच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१४ अशा दोन वेळा आमदार म्हणून निवडून आला होता.
२०१४ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पायउतार झाल्यानंतर भुजबळ यांना मनी लाँडरिंगचा आरोप ठेवून, अटक करण्यात आली. भुजबळांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात काढला. अजित पवार यांच्यासह सत्तेत सामील झाल्यानंतर भुजबळ कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडले असले तरी येवला मतदारसंघात मात्र त्यांना पक्ष बदलल्यामुळे नाराजीचा सामना करावा लागू शकतो. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून पक्षांतर केल्याबद्दल मतदारसंघात त्यांच्याबद्दल फारशी सहानुभूती उरलेली नाही.
मराठा आरक्षणाच्या विरोधातील भूमिका अंगलट?
पक्षांतराबद्दल नाराजी असतानाच छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी त्यांनी जोरदार विरोध केला. भुजबळ हे माळी (ओबीसी) समाजातून येतात. त्यामुळेच शरद पवार यांनी माणिकराव शिंदे यांच्यासारखा मराठा उमेदवार त्यांच्यासमोर दिला असल्याचे बोलले जाते.
येवला मतदारसंघातील मराठाबहुल गावांनी भुजबळ यांना फोन करून, आमच्या गावात प्रचारासाठी येऊ नका, असे जाहीर आवाहन केल्याच्या फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत. काही गावांमध्ये तर भुजबळ यांच्या ताफ्यावर हल्लाही झाला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळ यांना पाडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे.
शरद पवार आपल्या भाषणात काय म्हणाले?
मंगळवारी शरद पवार भाषणातून म्हणाले की, भुजबळ जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. “माझी मुलगी सुप्रिया सुळे भुजबळांना भेटण्यासाठी तुरुंगात गेली होती. तसेच ते बाहेर आल्यानंतर पक्षाने २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट दिले. महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर पहिल्या शपथविधीच्या वेळीच त्यांना मंत्रिपद देण्यात आले; पण भुजबळांची विचारधारेवर निष्ठा नाही. त्यांनी पक्ष, जनता आणि नेतृत्वाचा विश्वासघात केला. आता त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
छगन भुजबळ मात्र प्रचारात शरद पवारांवर टीका न करता, केवळ मलाच लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. अजित पवार यांच्यासह अनेक आमदार पक्षातून बाहेर पडले, तरीही मलाच अधिक लक्ष्य केले जात आहे, अशीही प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. माझ्या कामाच्या आधारावर मला मत द्यावे, आरक्षण आंदोलनात केलेल्या विधानांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन भुजबळ करीत आहेत. “काही लोक जातीचे विष पसरवून राजकारण करीत आहेत. मी मात्र जात पाहत नाही. मी इथे विकास करण्यासाठी आलो होतो. मी सर्वांसाठी काम केले”, असे आवाहन भुजबळ मतदारांना करीत आहेत.