Sharad Pawar offer prayers at Lalbaugcha Raja: गणेशोत्सवाच्या सणादरम्यान राजकीय पुढारी, सेलिब्रिटी एखाद्या गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन आशीर्वाद घेणे, ही नित्याचीच बाब झाली आहे. मुंबईतील ‘लालबागचा राजा’च्या दर्शनालाही आता केंद्रीय मंत्र्यांपासून, उद्योगपती ते सेलिब्रिटीपर्यंत अनेक व्हीआयपी मंडळी भेट देत असतात. मात्र, सध्या शरद पवारांनी लालबागच्या राजाला भेट देऊन, दर्शन घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात याची अधिक चर्चा रंगत आहे. सोमवारी (९ सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार आपल्या कुटुंबासह आले. त्यांच्यासह जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे उपस्थित होते.
शरद पवार यांचे विरोधक मात्र या गणपती दर्शनाकडे राजकीय खेळी म्हणून पाहत आहेत; मात्र शरद पवार गटाने ही शक्यता फेटाळून लावली. शरद पवार यांच्याबरोबर काम केलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, आमच्या माहितीप्रमाणे शरद पवारांची नात रेवती सुळे हिने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर शरद पवार यांनी आजोबा या नात्याने तिला लालबागच्या राजाचे दर्शन घडविले. इतकी ही सामान्य बाब आहे.
ज्ञानेश महाराव यांच्या कार्यक्रमावरून वाद?
मागच्याच महिन्यात पत्रकार व लेखक ज्ञानेश महाराव यांच्यासह एका कार्यक्रमात मंचावर बसल्यामुळे शरद पवार यांच्यावर टीका होत होती. नवी मुंबई येथे २२ ऑगस्ट रोजी झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार आणि कोल्हापूरचे छत्रपती खासदार शाहू महाराज हे ज्ञानेश महाराव यांच्याबरोबर उपस्थित होते. यावेळी महाराव यांनी राम मंदिराबाबत केलेले वक्तव्य वादात अडकले आहे. हिंदू संघटनांनी या विधानावर आक्षेप घेतला आहे.
ज्ञानेश महाराव आपल्या भाषणात म्हणाले होते, “एका धोब्याच्या सांगण्यावरून देव आपल्या गर्भवती पत्नीला घराबाहेर कसा काय काढू शकतो? आपण अशा देवासाठी मंदिर बांधतोय याची लाज वाटायला हवी. कुणी माझ्या गरोदर बहिणीला घराबाहेर काढले असते, तर मी शांत बसलो असतो का? मी तिच्या पतीला पुन्हा घरात पाऊल ठेवू दिले नसते.”
ज्ञानेश महाराव यांच्याबरोबर मंचावर एकत्र बसणे आणि त्यांच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया न देणे यांमुळे उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून शरद पवारांवर टीका होत आहे. अशातच त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यामुळे आपल्याविरोधात होणाऱ्या टीकेला बोथट करण्यासाठी शरद पवारांनी इतक्या वर्षांनंतर जाणूनबुजून गणपती मंडळाला भेट दिली, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठा गटाने मात्र या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
भाजपाने काय टीका केली?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पवारांचे गणपती दर्शन राजकीय हेतूने आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर ते हिंदू मतपेटीला आकर्षित करू पाहत आहेत. महायुतीमुळेच त्यांच्यात हा बदल घडून आला आहे. तर, राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी शरद पवारांना तीन दशके का लागली? कदाचित सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करावे, अशी इच्छा त्यांनी गणरायाकडे व्यक्त केली असेल. पण, महायुतीच सत्तेत येणार असल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही.”
भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी तर शरद पवारांच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “मागच्या ४० वर्षांत आम्ही शरद पवारांना देवदर्शन करताना कधी पाहिले नाही.” शरद पवार हे सहा दशकांपासून राजकीय जीवनात काम करीत आहेत. यादरम्यान ते क्वचितच मंदिरांना भेटी देताना दिसले आहेत.
दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, शरद पवारांना एकदा त्यांच्या सल्लागारांनी धार्मिक बाबा-बुवांच्या भेटीगाठी घेण्याची सूचना केली होती. तेव्हा शरद पवारांनी, “तुमच्या मतांचा अनादर करत नाही”, असे सांगून यासाठी नम्रपणे नकार दिला होता. एकदा शरद पवारांना विचारले गेले की, तुम्ही देवाला मानता का? तेव्हा ते म्हणाले, “मी धार्मिक कट्टरता मानत नाही. हो, पण अशी एक शक्ती आहे, जी सर्वांनाच मान्य करावी लागेल.”