Sharad Pawar on RSS: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड असा विजय प्राप्त केल्यानतंर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. मविआचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने नुकतीच मुंबईत पक्षाची बैठक घेतली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाकडे लक्ष वेधले. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, संघाच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारधारेशी असलेली निष्ठा आणि वचनबद्धता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आली. आपणही छत्रपती शाहू महाराज, जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळे उभारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

शरद पवारांना आताच संघाप्रमाणे विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांची बांधणी करण्याची गरज का वाटत आहे? याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसने एक लेख प्रकाशित केला आहे. त्यात संघाची निवडणुकीतील भूमिका, त्यांच्याबद्दलचे विरोधकांचे काय मत आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शरद पवारांनी संघाची स्तुती केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या विधानाचा संदर्भ स्पष्ट केला. ते म्हणाले, “कार्यकर्त्यांची निष्ठा व वचनबद्धता याच अनुषंगाने शरद पवार यांनी संघाचा उल्लेख केला. जर एखादी चांगली गोष्ट असेल, तर त्यावर चर्चा करायला काय हरकत आहे? याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) किंवा पक्षाचे नेते त्यांची विचारधारा स्वीकारणार आहोत, असे होत नाही.

हे वाचा >> संघाच्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली

विधानसभेसाठी भाजपाने घेतली संघाची मदत

मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा पराभव झाला. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी केवळ १७ मतदारसंघांत महायुतीला विजय मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या निवडणुकीतून अंग काढून घेतल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने संघाची प्रचारात मदत घेतली. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीआधी संघाच्या नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. महायुतीच्या घटक पक्षांची प्रचाराची रणनीती आणि विरोधकांच्या कथित फेक नॅरेटिव्हचा सामना करण्याची व्यूहरचना या बैठकीत आखली गेल्याचे सांगितले गेले. परिणामी महायुतीला २८८ पैकी २३५ मतदारसंघांत विजय मिळाला; तर एकट्या भाजपाने १४९ पैकी १३२ इतक्या विक्रमी जागा जिंकल्या. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला अनुक्रमे ५७ आणि ४१ जागा मिळाल्या.

संघाची निवडणुकीतील भूमिका

मात्र, विधानसभा निवडणुकीतील भूमिकेबाबत संघाने अद्याप मौन बाळगलेले आहे. त्यांनी ना विजयाचे श्रेय घेतले, ना त्यांनी भाजपाला महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मदत केल्याचा दावा केला. दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संघ आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांनी निवडणुकीत मोठी भूमिका बजावली. त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केल्यामुळे महायुतीचा मोठा विजय झाला.

हे ही वाचा >> RSS Marks 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव कसे ठरले माहिती आहे का? आधी या नावावर झाला होता विचार

संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना म्हणाले की, आमच्या संघटनेची शताब्दी पूर्ण होत आहे. त्याग आणि समर्पण हे दोन गुण आमची ओळख आहेत. आम्हाला जे काही काम दिले जाते, ते विनासायास पार पाडणे, ही आमची जबाबदारी असते.

संघ आणि भाजपाचे घनिष्ठ संबंध असतानाही मागच्या काही काळात दोघांमध्ये विसंवाद झाल्याचे समोर आले होते. जसे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाचे नाव न घेता टीकात्मक वक्तव्य केले होते.

संघ आणि विरोधक

शरद पवारांनी संघाप्रमाणे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणाऱ्या आणि विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. याचा अर्थ बिगर हिंदुत्ववादी किंवा धर्मनिरपेक्ष सामाजिक संघटन असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

हे ही वाचा >> Ambedkar and RSS-BJP: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांच्या विचारांशी कधी आणि कसं जुळवून घ्यायला सुरुवात केली?

काँग्रेसकडे सेवा दल आहे; ज्याची स्थापना १९२४ साली नागपूर येथे झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसचा आधारस्तंभ असलेली ही संघटना काळानुरूप कमकुवत होत गेली. महाराष्ट्रात एकाही राजकीय पक्षाने संघासारखी समांतर संघटना उभारलेली नाही, जी त्यांना राजकीय सहकार्य करू शकेल.

बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली जेव्हा शिवसेनेची स्थापना केली होती, तेव्हा त्यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. मात्र, कालांतराने शिवसेना (दोन्ही गट) ही फक्त राजकारणापुरती मर्यादित राहिली.

दरम्यान, १९६० ते २००० या काळात काँग्रेस आणि संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात अनेक सामाजिक – आर्थिक संस्था स्थापन केल्या. त्यात प्रामुख्याने सहकारी संस्थांचा समावेश होता. मात्र, या संस्थांचा राजकारणावरील प्रभाव काळाच्या ओघात कमी होत गेला.

Story img Loader