यंदा सरकार स्थापन झाले नाही तरी काँग्रेस प्रगतिपथावर आहे, असा शरद पवार यांना विश्वास असल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या सहयोगी संपादक नीरजा चौधरी यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. या लेखात त्यांनी शरद पवार यांच्या एकूण मुलाखतीविषयी, मुलाखतीत केलेल्या विधानांच्या संभाव्यतेविषयी लिहिले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला शरद पवार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. प्रादेशिक पक्ष येत्या काही महिन्यांत काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील आणि त्यांच्यापैकी काही जुने पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतील. त्या पक्षांपैकी एक आपला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) असू शकतो, असे ते म्हणाले होते.

“मोदींचे विचार पचनी पडणे कठीण”

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील सभेला संबोधित करून परतल्यानंतर त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व आम आदमी या पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांच्या हॉटेलच्या खोलीत हे संभाषण झाले. मतदानानंतरच्या शक्यतांकडे पाहताना पवार म्हणाले, “मोदींशी जुळवून घेणे आणि त्यांचे विचार आमच्या पचनी पडणे कठीण झाले आहे.” त्यांचे हे शब्द काँग्रेसच्या भविष्याविषयी होते, तितकेच त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या संभाव्यतेबद्दलही होते. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यांचे पुतणे अजित पवार यांनी मोठ्या संख्येने पक्षाचे आमदार आणि खासदार आपल्या बाजूने वळवून घेतले. तसेच पक्षाचे निवडणूक चिन्हही काढून घेतले. या परिस्थितीत पवार यांच्याकडे मोजकेच नेते राहिले.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती

हेही वाचा : इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?

आता ८३ वर्षीय पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांची राजकीय प्रासंगिकता टिकवून ठेवण्यासाठी लढत आहेत. सुळे यांचे भवितव्य भाजपापेक्षा काँग्रेसमध्ये अधिक सुरक्षित असल्याचे त्यांना स्पष्ट दिसते. १९९९ मध्ये सोनिया गांधींना आव्हान देऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यामुळे काँग्रेसदेखील त्यांच्याकडे सावधतेने पाहते. परंतु, काही महिन्यांनंतर पवारांनी त्याच सोनियांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी हातमिळवणी केली होती. यातून त्यांची राजकीय व्यावहारिकता अधोरेखित होते.

पवारांचे लक्ष्य विधानसभा निवडणुकीवर

त्याशिवाय या लोकसभा निवडणुकीमध्ये ते महाविकास आघाडीसाठी मोठ्या प्रमाणात काम करताना आणि आघाडीची जबाबदारी घेताना दिसत आहेत. पवारांचे लक्ष्य महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अधिक महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकीवर आहे; जिथे महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संभाव्यतेवर परिणाम होईल आणि त्याचा फायदा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला होईल. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये म्हणजेच पवारांच्या मैदानात सुळे यांची बंडखोर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट लढत आहे. सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातही विजय खेचून आणला, तर पुतण्यासोबत गेलेले अनेक जण शरद पवारांच्या बाजूला परत येऊ शकतात. कारण- काँग्रेस हे त्यांच्यासाठी भाजपापेक्षा अधिक परिचयाचे मैदान आहे.

अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर काकांकडे परततील का?

काका-पुतणे नुकतेच कुटुंबातीलच एका लग्नात एकत्र दिसले. या लग्नात एक पत्रकारदेखील उपस्थित होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, फार लांब अंतरावर बसलेले नसतानादेखील ते एकमेकांशी एकही शब्द बोलले नाहीत. वधू-वरांनी आधी पवार आणि नंतर अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले. पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याबद्दल उपस्थितांपैकी बहुतेक जण नाराज होते. भाजपाकडून फारसे काही न मिळालेले अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर काकांकडे परततील का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरेंबद्दलही महाराष्ट्रात सहानुभूती आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा कसा विश्वासघात केला, हाच मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) या दोघांनाही महाराष्ट्रात सहानुभूती आहे. परंतु, या दोन्ही पक्षांत फूट पडल्यामुळे ते लोकसभेच्या नक्की किती जागांवर निवडून येऊ शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना या सहानुभूतीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

पवारांनी स्वतःच्या पक्षाबरोबरच इतर प्रादेशिक पक्षही काँग्रेसच्या जवळ येत असल्याचे सांगितले. परंतु, जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस यांसारख्या बंडखोर काँग्रेस नेत्यांनी स्थापन केलेल्या पक्षांसाठी हे शक्य दिसत नाही. या दोन्ही पक्षांनी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील काँग्रेसचे अस्तित्वच जवळ जवळ संपवले. परंतु, भाजपाने निवडणुकीत अधिक जागा जिंकल्यास वायएसआरसीपी आणि तृणमूल दोन्ही पक्ष काँग्रेसबरोबर काम करतील अशी शक्यता आहे.

१३ मे रोजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करणाऱ्या आंध्र प्रदेशमधील वायएसआरसीपीला काँग्रेसने स्पष्ट पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. राज्यात सध्या काँग्रेसचे फारसे अस्तित्व नाही; तर भाजपाने आंध्र प्रदेशमधील मुख्य पक्ष असलेल्या टीडीपीबरोबर करार केला आहे. समाजवादी पक्ष किंवा आरजेडीसारखे पक्ष​​देखील काँग्रेसमध्ये विसर्जित होण्याची शक्यता नाही. परंतु, तेदेखील काँग्रेसबरोबर जवळून काम करणे सुरू ठेवू शकतात.

राहुल गांधींची मोरारजी देसाईंशी तुलना

१९७७ मध्ये आघाडी सरकारचे पंतप्रधान असताना मोरारजी देसाई यांच्या सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या गुणाचा उल्लेख करून शरद पवार यांनी राहुल गांधी यांची तुलना मोरारजी देसाई यांच्याशी केली होती. पवारांच्या म्हणण्यानुसार, आजची परिस्थिती १९७७ सारखीच आहे. कारण- युती करणाऱ्या विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविलेला नाही.

स्वातंत्र्यानंतर काही काळासाठी काँग्रेसने समाजवादी, तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या नेत्यांना सामावून घेतले. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील पक्षापासून वेगळे झाले आणि त्यांनी १९५१ भारतीय जनसंघाची (भाजपाचा अग्रदूत) स्थापना केली.

हेही वाचा : भाजपाला समर्थन देणारे आणखी १० आमदार काँग्रेसच्या संपर्कात? हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

२०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर एकपक्षीय वर्चस्वाकडे वाटचाल सुरू झाली आणि काँग्रेससमोर अनेक आव्हाने उभी राहिली. भाजपाची एका नेत्याभोवती पक्ष एकवटण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, काँग्रेस आता इतर पक्षांना घेऊन चालू शकेल का? नेहरू-गांधी घराण्याच्या नेतृत्वाखाली हे शक्य आहे का? पवारांच्या मुलाखतीतून असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण, राजकारण हा आकड्यांचा खेळ असल्याने शेवटी सर्व काही ‘कौन कितने पानी में है’ (कोण किती जागा जिंकेल) यावर अवलंबून असते.

Story img Loader