सिद्धेश्वर डुकरे

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मराठवाड्यात पहिली जाहीर सभा गुरुवारी बीड जिल्ह्यात होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून आणण्याचे चाललेले प्रयत्न, अजित पवार यांनी घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!

पक्षात फुट नको म्हणून शरद पवार यांनी मोठ्या मनाने आपणास माफ करून भाजपबरोबर जाण्यास पाठींबा आणि आशिर्वाद द्यावेत यासाठी सर्व मंत्री तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोनदा पवार यांची मुंबईत गाठ घेण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. भाजपबरोबर कोणत्याही परिस्थितीत जायचे नाही या भुमिकेवर शरद पवार ठाम आहेत. पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली, पण पवारांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात शरद पवार यांची सभा होत आहे. अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेले यांच्या विषयी कोणती भुमिका शरद पवार या सभेत घेतात याकडे काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे देखील पवारांच्या भाषणाबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा >>> मोदींची ‘मी पुन्हा येईन’ची लाल किल्ल्यावरून गर्जना

‘सह्याद्री बोलावतोय… चला, मनगटातील ताकद एकवटून महाराष्ट्र रक्षणाचा निर्धार करूया. दिल्लीच्या तख्ताला राष्ट्रवादी स्वाभिमान दाखवून देऊया. शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी ‘ या सभेला मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सभेच्या तयारीसाठी युवा आमदार रोहीत पवार आणि प्रवक्ते महेश तपासे तीन ते चार दिवस अगोदर मराठवाड्यात गेले आहेत. पवार यांनी पक्षात फुट पडल्यानंतर पहिली सभा मध्य महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात येवल्यात घेतली. ज्येष्ठ सहकारी छगन भुजबळ यांना ओळखण्यात चुक झाली.

ही चुक सुधारण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी येथे आलो आहे, असे विधान शरद पवार यांनी तेथे केले होते. येवल्यातील सभेला युवकांचा तसेच पवारांना मानणाऱ्या निष्टावान कार्यकत्यांचा प्रतिसाद दिसून आला. आता राज्यातील दुसऱ्या आणि मराठवाड्यातील पहिल्याच सभेत शरद पवार अजित पवारसह भाजपसोबत सत्तेत गेलेले यांच्याविषयी काय बोलतात, सोबत असलेल्या निष्टावानाना तसेच युवकांना काय संदेश देतात य शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राजकारण याचा कोणत्या शब्दांत समाचार घेतात, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.