जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन आणि मंडल आयोग यामुळे राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे शरद यादव हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. जबलपूर ते बिहार व्हाया उत्तर प्रदेश असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. शरद यादव हे असे राजकारणी होते ज्यांना भारतीय राजकारणाचा इतिहास कधीच विसरणार नाही. अनेक सरकारं स्थापन करण्यात आणि पाडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१९७० च्या दशकात काय घडलं?
१९७० च्या दशकात जयप्रकाश नारायण यांनी जी चळवळ उभी केली त्या चळवळीतून देशाला तीन महत्त्वाचे नेते मिळाले. पहिले होते शरद यादव, दुसरे होते नितीशकुमार आणि तिसरे होते लालूप्रसाद यादव. हे तिघांमधलं नातं भावांसारखं होतं. समाजवादी विचारधारेचा या तिघांवर खूप प्रभाव पडला होता. या तिघांमधले नितीशकुमार आणि लालू यादव हे बिहारचे होते तर शरद यादव मध्य प्रदेशातले. सुरूवातीला चळवळीच्या निमित्ताने एकत्र आलेले या तिघांच्या नात्यात फूट पडली ती आपल्या आपल्या राजकीय महत्वकांक्षांमुळे.
याच कालावधीत नितीशकुमारांना जवळ करत शरद यादव यांनी लालू प्रसाद यादव यांना मधेपुरातून हरवलं. नितीश कुमार आणि शरद यादव एकत्र आले असं वाटलं. मात्र जेव्हा वेळ आली तेव्हा नितीशकुमारांनी शरद यादवांना दुधातल्या माशीसारखं बाजूला केलं.
शरद यादव, नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी आपली राजकीय कारकीर्द सोबत सुरू केली होती. मात्र मंडल आयोगाच्या स्थापनेनंतर शरद यादव यांनी उत्तर प्रदेशातून आपलं राजकारण बिहारला वळवलं. त्यामुळे बिहारच्या राजकारणात एकमेकांचे चांगले मित्र असलेले एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.
९० च्या दशकात लालूप्रसाद यादव यांचं राजकारणात स्थिर स्थावर झाले. मात्र नितीशकुमार यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आणखी मोठी होती. त्यामुळे लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांचे मार्ग आपसूकच वेगळे झाले. त्यावेळी लालूप्रसाद यादव आणि शरद यादव एकत्र होते. मात्र नितीशकुमार जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत गेले. १९९७ मध्ये लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यातलं नातं दीर्घकाळासाठी तुटलं. नितीश कुमार यांनी जनता दलापासून वेगळं होत समता पार्टी स्थापन केली. राष्ट्रीय जनता दल हा पक्ष लालू प्रसाद यादवांनी स्थापन केला. जनता दल शरद यादव यांच्याकडेच राहिला मात्र जनता दल यू या नावाने त्यांनी पक्ष स्थापला.
अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा NDA चं सरकार देशात आलं. जॉर्ज फर्नांडिस यांची समता पार्टी आणि शरद यादव यांची जदयू हे देखील या सरकारचा भाग होते. त्या काळात शरद यादव आणि नितीश कुमार यादव यांच्यातले परस्पर संबंध पुन्हा चांगले झाले. त्यावेळी नितीश कुमार यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने जॉर्ज फर्नांडिस यांना त्यांचा समता पार्टी हा पक्ष जेडीयू मध्ये विलीन करण्यास भाग पाडलं. त्यामुळे २००३ मध्ये शरद यादव, नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस एकत्र झाले.
नितीश कुमार यांच्या समता पार्टीचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस होते. तर रामविलास पासवान लोकशक्ती पार्टीने शरद यादव यांच्यासोबत जात जनता दल यू स्थापला. २००३ मध्ये नितीश कुमार यांना शरद यादव यांच्या रूपाने एक भक्कम साथीदार मिळाला. नितीश कुमार यांनी शरद यादव यांना २००४ मध्ये राज्यसभेवर पाठवलं आणि जॉर्ज फर्नांडिस यांना जेडीयूचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं. नितीश कुमार यांची खेळी हीच होती. शरद यादव यांना सोबत घेऊन त्यांनी आधी जॉर्ज फर्नांडिस यांना अलगद बाजूला केलं. त्यानंतर २००९ मध्ये तर जॉर्ज फर्नांडिस यांना तिकिटही दिलं नाही. त्यावेळी मुजफ्फरपूर मधून जॉर्ज फर्नांडिस यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पण ते जिंकले नाहीत.
नितीशकुमारांसाठी शरद यादव हे कायमच ढालीसारखे उभे होते. मग ते जॉर्ज फर्नांडिस यांचा राजकीय वनवास असो किंवा लालूप्रसाद यादव यांच्याकडून सत्तेची खुर्ची हिसकावणं असो. बिहारची सत्ता वारंवार मिळवण्यासाठी नितीशकुमार यांना उपयोगी पडले ते शरद यादव. शरद यादव यांच्या करीश्म्यामुळे नितिशकुमार मुस्लिम मतंही जोडू शकले.
२०१३ मध्ये बिहारच्या राजकारणात काही बदल झाले. ही ती वेळ होती जेव्हा भाजपाने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केलं होतं. त्यावेळी भाजपासोबत नितीशकुमारांनी नातं तोडलं. त्यामुळे एनडीएसोबत असलेली त्यांची १३ वर्षांची मैत्री तुटली. या कठीण स्थितीतही शरद यादव यांनी पुढे येत नितीश कुमार यांच्यासाठी खिंड लढवली. नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यात राजकीय स्पर्धा होती अशावेळी शरद यादव यांनी नितीशकुमारांची साथ दिली. २०१५ मध्ये एकमेकांपासून वैचारिक मतभेदांमुळे आणि राजकीय महत्त्वाकांक्षामुळे दूर गेलेल्या लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांना शरद यादवांनी एकत्र आणलं.
नरेंद्र मोदींच्या राजकारणात नितीशकुमारांसमोर एक वेळ अशी आली होती की त्यांच्यासमोर आपल्या राजकीय अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी पुन्हा एकदा शरद यादवच त्यांच्या मदतीला धावले. २०१५ मध्ये भाजपाला हरवत नितीशकुमारांनी बिहारची सत्ता कायम राखली. मात्र जुलै २०१७ मध्ये लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांचे संबंध पुन्हा बिघडले. भ्रष्टाचाराचे आरोप करत नितीशकुमारांनी लालूप्रसाद यादवांची साथ सोडली. त्यानंतर नितीशकुमारांनी पुन्हा भाजपाला जवळ केलं.
शरद यादव यांना नितीशकुमार भाजपासोबत जाणार याची पुसटशी कल्पनाही दिली गेली नाही. त्यामुळेच शरद यादव यांनी बंड केलं. त्यामुळे नितीश कुमारांचा खंदा समर्थक त्यांच्या विरोधात झाला. या सगळ्याचा परिणाम काय होणार हे वाटत असतानाच नितीश कुमारांनी शरद यादव यांची पक्षातून हकलपट्टी केली. त्यामुळे शरद यादव यांना राज्यसभेची खासदारकी सोडावी लागली आणि आपला बंगलाही सोडावा लागला. त्यानंतर २०१८ मध्ये शरद यादव यांनी लोकतांत्रिक जनता दल स्थापन केलं. मात्र २०२२ मध्ये राष्ट्रीय जनता दलात आपला पक्ष विलीन केला. शरद यादव हे कायमच नितीशकुमारांसाठी ढाल म्हणून किंवा खंदे समर्थक म्हणून उभे राहिले पण नितीशकुमारांनी मात्र त्यांची वेळ आली तेव्हा त्यांना बाजूला केलं. शरद यादव यांच्या अखेरच्या काळात दोघांचे संबंध सुधारले होते.