तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज पाटण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं कौतुक करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या चहा विकण्यावरूनही टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “नोटीस धाडायची असेल तर खुशाल धाडा..” म्हणत प्रसिद्ध गायिका नेहा राठोडने आणलं बेरोजगारीवर नवं गाणं

नेमकं काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

आगामी २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात. राहुल गांधींमध्ये ती क्षमता आहे. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा ही एक क्रांतिकारी यात्रा होती. त्यामुळे आगामी २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असतील, अशी प्रक्रिया सिन्हा यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी २०२४ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गेमचेंजर ठरतील, असा दावाही केला.

तेजस्वी यादवांचं शत्रुघ्न सिन्हाकडून कौतुक

पुढे बोलताना त्यांनी बिहारचे उपमुख्यंत्री तेजस्वी यादव यांचंही कौतुक केलं. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. त्यांना आता चांगला अनुभव आला आहे. बिहारचे भविष्य म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. मुळात मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्यासाठी तुम्हाला योग्यतेबरोबरच समर्थनाची गरज असते, असे ते म्हणाले.

हेही वाचा – सोनिया-राहुल यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीवर खल

पंतप्रधान मोदींवर टीका

दरम्यान, त्यांनी चहा विकण्याच्या दाव्यावरूनही पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधान मोदींनी चहा विकला होता, यावर माझा विश्वास नाही. ती केवळ एक अफवा होती. खोटा प्रचार होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha statement about rahul gandhi as pm candidate in 2024 lokabha election spb