संतोष प्रधान

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू असून, चिन्हाचा निर्णय येत्या तीन-चार दिवसांत निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे. गेली ३३ वर्षे शिवसेनेकडे असलेले धनुष्यबाण हे चिन्ह आता पक्षाकडे राहणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. यातूनच शिवसेनेने दुसऱ्या निवडणूक चिन्हासाठी तयारी केल्याचेही बोलले जाते.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लोकसत्ताचे अ‍ॅप डाऊनलोड करून लॉग-इन करा

अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा
download app

शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात पक्षाने अनेक चढउतार बघितले. १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९६७ मध्ये शिवसेनेने ठाणे नगरपालिकेची पहिली निवडणूक लढविली होती. त्यानंतर १९६८ मध्ये मुंबई महानगरपालिकेची. तेव्हा शिवसेनेना ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरली होती. १९८०च्या दशकात लोकसभा आणि विधानसभेला शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते. मनोहर जोशी यांनी लोकसभा तर १९७८ मध्ये सुभाष देसाई यांच्यासह काही शिवसेनेच्या उमेदवारांनी रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढविली होती. १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाली होती. मशाल, बॅट बाॅल अशा काही चिन्हांचा समावेश होता. तेव्हा छगन भुजबळ माझगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. भुजबळ यांचे चिन्ह मशाल होते. विशेष म्हणजे शिवसेना तेव्हा नोंदणीकृत किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्ष नसल्याने भुजबळ हे विधानसभा सचिवालयाच्या नोंदी अपक्ष आमदार होते.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
mutton chops diwali meeting
चंद्रपूर: स्नेहमिलन दिवाळीचे, जेवणात मटनचॉप्स…निवडणुकीने सणाची व्याख्याच…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा : शिवसेना विरुद्ध शिवसेना

महानगरपालिका वा नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला समान चिन्ह मिळत असे. १९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेने जिंकली तेव्हा धनुष्यबाण चिन्ह होते. शिवसेनेचे सर्व उमेदवार तेव्हा धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते, असे गिरगावमधील तत्कालीन नगरसेवक दिलीप नाईक यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : सोनिया गांधी ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी; कर्नाटकात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

१९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह

शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना नोंदणी करण्याची सूचना केली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व नेतेमंडळींची बैठक घेऊन नोंदणीबाबत चर्चा केली होती. मनोहर जोशी, मी आणि विजय नाडकर्णी यांनी नवी दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या नोंदणीची सारी प्रक्रिया पूर्ण केली होती, अशी आठवण शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितली. निवडणूक आयोगाने तेव्हा शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाचे वाटप केले. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. निवडणूक आयोगाच्या निकषांची शिवसेनेने पूर्तता केली होती. कारण निवडणूक आयोगाच्या निकषांपेक्षा शिवसेनेच्या मतांची टक्केवारी अधिक होती. धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडे कायम राहिले. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता आले. तेव्हापासून शिवसेनेने कधीच मागे वळून बघितलेले नाही, असेही देसाई यांनी सांगितले. ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल किंवा अन्य अपक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे शिवसेनेला तेव्हा लोकसभा अथवा विधानसभेला मिळत असत. शिवसेना तेव्हा नोंदणीकृत पक्ष नसल्याने लोकसभा वा विधानसभेला अपक्ष म्हणूनच गणना होत असे याकडेही देसाई यांनी लक्ष वेधले. १९८५ मध्ये भुजबळ हे शिवसेनेचे एकमेव आमदार निवडून आले होते पण ते सुद्धा अपक्षच होते.

हेही वाचा : विश्लेषण : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना ‘त्रिशूळ’ हे पक्षचिन्ह का मिळालं नाही?

१९८९ पासून म्हणजे गेली ३३ वर्षे धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडे आहे. हे चिन्ह शिवसेनेकडे कायम राहते की, शिंदे गटाकडे जाते की गोठविले जाते याचीच आता उत्सुकता आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी चिन्हावर काही तरी निर्णय अपेक्षित आहे.