हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या १२ नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे. यासाठी भाजपाकडून उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतील एका चहावाल्याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहे. भाजपाने शिमला अर्बनमधून एका चहावाल्याला उमेदवारी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘ट्रॅफिकचे नियम तोडले तरी दंड नाही,’ गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांची घोषणा, पण अपघातांची आकडेवारी मात्र चिंता वाढवणारी!

संजय सूद हे गरीब कुटुंबातील असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते शिमला बस स्थानकावर चहाचा गाडा चालवतात. ८० च्या दशकात महाविद्यालयात असताना ते अभाविपचे (ABVP) सदस्य होते. सूद यांनी स्थानिक भाजपा नेत्यांसाठी बुथ स्थरावरून कामाला सुरूवात केली. आज त्यांनी पक्षात आपले स्थान मजबूत केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची शिमला भाजपाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच ते भाजपाचे मीडिया प्रभारीही होते.

हेही वाचा – गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत रोजगाराचा मुद्दा केंद्रस्थानी; ‘आप’ १० लाख नोकऱ्या देणार, भाजपाच्या जाहिरनाम्यात काय?

२००० साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते काही काळासाठी शिमला भाजपाचे जिल्हाध्यक्षही होते. भाजपाने शिमला अर्बनसाठी जेव्हा उमेदवारांची घोषणा केली, तेव्हा ते चहाच्या गाड्यावर काम करत होते. सूद यांच्यापूर्वी भाजपाचे दिग्गज नेते सुरेश भारद्वाज शिमला अर्बनचे आमदार होते. मात्र, यंदा भाजपाने त्यांना कंसुपटी विधासभा मतदार संघातून तिकीट दिली आहे. दरम्यान, शिमला येथील जनता आपल्याला भरघोस मताने निवडून देईल, असा विश्वास सूद यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shimla urban candidate sanjay sood bjp real chaiwala candidate himachal pradesh election spb