संतोष प्रधान
लोकसभेच्या २००९च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचे प्रस्थ वाढविण्यास हातभार लावला होता व त्याचा काँग्रेसला निवडणुकीत चांगलाच फायदा झाला होता. याच प्रमाणे टोलच्या मुद्द्यावर शिंदे व भाजप सरकारने राज ठाकरे यांचे महत्त्व वाढविण्यावर तसेच मनसेला ठाणे, मुंबईत ताकद मिळेल या दृष्टीने पद्दतशीरपणे प्रयत्न सुरू केलेले दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईच्या वेशीवरील पाच टोल नाक्यांवरील टोलच्या दरात वाढ झाल्यापासून मनसेने आंदोलन सुरू केले. ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी उपोषण केले. एरव्ही मनसेच्या आंदोलनाला केवळ नैतिक पाठबळ देणारे राज ठाकरे स्वत: आंदोलनात उतरले. त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच टोलच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. टोल नाके जाळण्याचा इशारा दिला.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये दीर व भावजयेत सुप्त संघर्ष

काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आंदोलनाचा इशारा दिल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खिल्ली उडविली जाते वा आंदोलनातील हवा काढण्याचा प्रयत्न होतो. राज ठाकरे यांच्या टोल नाके जाळण्याच्या इशाऱ्यानंतर मुलुंड नाक्यावरील टोल बुथमध्ये जळका टायर फेकण्यात आला. राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिल्यानंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांचे म्हणणे ऐकून घेतले.

हेही वाचा… नागपूर काँग्रेसमधील गटबाजी कधी संपणार? बैठकीतील गोंधळामुळे कार्यकर्ते संतप्त

दुसरीकडे, सर्वच टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमध्ये सवलत देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्यही राज ठाकरे किंवा मनसेच्या पथ्थ्यावरच पडले. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर गुरुवारी सायंकाळी बैठक घेतली. ठाकरे यांच्या मागणीनुसार शुक्रवारी सकाळी रस्ते विकास मंडळाचे मंत्री दादा भूसे यांना त्यांच्या निवासस्थानी जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार भुसे व अन्य अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. आपण केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या टोलबाबतच्या सर्व मागण्या मान्य करणे किंवा देवेद्र फडणवीस यांनी टोलबाबत वरक्तव्य करणे हे सारे महायुती सरकारकडून मनसेला एकप्रकारे ताकद देण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा… बेरोजगारी, ओबीसी ते आदिवासी! मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या केंद्रस्थानी ‘हे’ प्रमुख मुद्दे

टोलचा मुद्दा सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या आहे. टोलच्या विरोधात राज ठाकरे अधिक आक्रमक झाले आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्यास मनसेला मुंबई व ठाण्यात फायदा होऊ शकतो. हेच शिंदे व फडणवीस यांना अपेक्षित आहे. शिवसेनेतील फुटीनंतरही एकनाथ शिंदे यांचा मुंबईत प्रभाव पडलेला नाही. मुंबईत अजूनही सामान्य मतदार हा उद्धव ठाकरे गटाबरोबर आहे. यामुळेच ठाकरे गटाला राजकीय शह देण्याकरिता शिंदे-फडणवीस यांच्याकडून राज ठाकरे यांचा वापर करून घेण्यात येत असल्याचे चित्र आहे.

२००९ मध्ये काँग्रेसला फायदा

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आक्रमक झाले असता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली होती. मनसेला ताकद मिळावी म्ङणून सरकारकडून सारी मदत झाली होती. त्यातून मनसेची ताकद वाढली होती. २००९च्या लोकसभा आणि विघानसभा निवडणुकीत मनसेने शिवसेनेच्या मतांवर डल्ला मारली. मनसेच्या मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसचा फायदा झाला होता. याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करीत आहे.