संजय मोहिते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बुलढाणा : राज्यात मध्यावधी निवडणुका कधी होणार हे सांगण्याचा पोरकटपणा मी करणार नाही. पण राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आज नाही तर उद्या कोसळणार असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागणार असा रागरंग आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा… पक्षांतराच्या चर्चेचा गुंता वाढताच…चर्चा होतेच कशी, हा संभ्रम मलाही – अशोक चव्हाण
जयंत पाटील पुन्हा एकदा राज्यातील विविध मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. बुलढाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत व प्रसिद्धी माध्यमांशी मलकापूर, शेगाव येथे संवाद साधतांना जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. राज्य सरकारचे भवितव्य ‘सर्वोच्च’ निर्णयावर अवलंबून असल्याचे सांगून ते म्हणाले की ‘सुप्रीम कोर्ट’ हा निर्णय किती काळ लांबवेल हे सांगणे कठीण आहे. जर या देशात न्याय शिल्लक असेल तर संविधानाच्या दहाव्या सूची मधील तरतुदीनुसार बंडखोर आमदार अपात्र ठरले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. लोकशाही टिकविण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. तेव्हाच बंडखोरीच्या प्रवृत्ती आणि अशा लोकांना आळा बसेल असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. महाविकास आघाडीमध्ये मतभेद नसल्याचा पुनरुच्चार करून ज्यावेळी सत्ता असते तेंव्हा मतभेद असू शकतात असे सूचक विधान त्यांनी केले. सत्ता गेली आहे , आता सर्वांनी एकत्र येऊन भाजपाचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात घेऊन सर्व एकत्र राहतील असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. राज्यातील काँग्रेस बळकट होणे आमचीही गरज असून त्यामुळे राष्ट्रवादीसुद्धा बळकट होणार आहे. पंधरा वर्षे सोबत काम केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा… संभाजी ब्रिगेडच्या ‘वैचारिक कृतीशीलते’मुळे शिवसेनेसमोर नवे प्रश्न उभे राहण्याची शक्यता
घोषणवीर सरकार आणि संभाजी ब्रिगेड
जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर खरपूस टीका केली. एका आठवड्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम टाकण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली होती. मात्र अद्याप मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केेलेली नाही. शिवसेनेने संभाजी ब्रिगेड या पक्षासोबत युती जाहीर केली या संदर्भात विचारले असता, पाटील म्हणाले की, शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड पक्ष जोडला गेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये एक घटक पक्ष वाढला आहे. मात्र त्यांचे शिवसेनेसोबत नेमके काय बोलणे झाले हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आज त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही.