मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविल्याचा भाजप नेत्यांमधील सल सततच जाणवला. भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री पुत्राचा राजीनाम्याचा इशारा तर जाहिरातीतून कुरापत काढल्याने भाजपची जाहीर नाराजी यातून शिंदे गट आणि भाजपमधील बेबनाव जनतेसमोर आला आहे.
शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. ५० आमदारांचे पाठबळ असतानाही १०६ आमदार असलेल्या भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे जाहीर करूनही भाजप नेतृत्वाच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. शिंदे – फडणवीस यांचे सरकार असले तरी सरकारवर फडणवीस यांचाच पगडा जाणवला. शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिल्याची नाराजी भाजप नेत्यांमध्ये गेले वर्षभर सततच जाणवली. ‘मनावर दगड ठेवून आम्ही शिंदे यांना मुख्यमंत्री स्वीकारले’ असे विधान भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. ‘युतीत भाजप २४० जागा लढणार’ हे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानही शिंदे गटाला डिवचणारे होते. शिंदे गटाने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून भाजप व शिंदे गटात फार काही आलबेल नाही हेच सिद्ध झाले.
हेही वाचा – जमाखर्च : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तारेवरची कसरत
शिंदे हे फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत हे दाखविण्याच्या प्रयत्नांवरून भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजपने गेले काही दिवस शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात कुरघोड्या केल्या. याला कंटाळूनच शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना राजीनामा देण्याची भाषा करावी लागली. आम्ही दोघेही एकत्र आहोत हे दाखविण्याचा शिंदे व भाजप सतत प्रयत्न करीत असले तरी भाजप आणि शिंदे गट परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसल्याचे समोर आले. त्यातच शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना आवरा, असा संदेश भाजपने दिल्याने त्याचीही शिंदे गटात नाराजी बघायला मिळाली.
हेही वाचा – माजी मंत्री अनिल देशमुख यांना आताच विदर्भ का आठवला ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप युतीत नेहमीच खडाखडी व्हायची. शिंदे यांच्याकडे सूत्रे आल्यावरही यात बदल झालेला नाही.