कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचाराला रंग भरू लागला आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. राज्यात दहा मे रोजी मतदान आहे. मात्र एक मतदारसंघ असा वैशिष्ठ्यपूर्ण आहे की, येथून विजयी झालेला पक्ष राज्यात सत्ताधारी असतो. थोडक्यात येथील मतदारांना राज्यात वारे कोणत्या दिशेला हे समजते. गेल्या १२ निवडणुकीत हाच कल आहे. कित्तुर-कर्नाटक विभागातील शिरहट्टी हा तो मतदारसंघ. गदग जिल्ह्यात त्याचा समावेश होतो. १९७२ पासूनही ही परंपरा खंडीत झालेली नाही.
हेही वाचा >>> सिद्धरामय्या आणि शिवकुमार पररस्परांचे पत्ते कापण्यासाठी आतापासूनच सरसावले
पहिल्यांदा काँग्रेसनेही ही जागा जिंकली, त्यावेळी देवराज उर्स यांनी सरकार स्थापन केले. १९८३ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रसकडे होता. पुढे १९८३ मध्ये काँग्रेस आमदार फकीरप्पा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. निवडणुकीत विजयी झाल्यावर त्यांनी जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. रामकृष्ण हेगडे त्यावेळी मुख्यमंत्री झाले. पुन्हा १९८९ मध्ये काँग्रेसने पुन्हा ही जागा जिंकत राज्यात सरकार स्थापन केले. भाजपने २००८ मध्ये पहिल्यांदा येथून विजय मिळवत सत्ता मिळवली. पक्षाचे उमेदवार आर.एस.लामणी यांनी काँग्रेसच्या एच.आर.नायक यांचा पराभव केला. याच वर्षी भाजपने दक्षिणेकडील आपले राज्यातील पहिले बहुमतातील सरकार स्थापन केले. २०१३ मध्ये काँग्रेसच्या सिदलिंगाप्पा यांनी भाजपच्या लामणी यांचा ३१५ मतांनी पराभव केला. त्यावेळी काँग्रेसचे सिद्धरामैय्या मुख्यमंत्री झाले. पुन्हा १८ मध्ये भाजप उमेदवाराने विजय मिळवला. धर्मनिरपेक्ष जनता दल तसेच काँग्रेसचे सरकार १४ महिन्यांत कोसळल्यानंतर कर्नाटकमध्ये पुन्हा भाजप सरकार सत्तारुढ झाले. एकूणच काय शिरहट्टीचा कौल सत्तेसाठी महत्त्वाचा आहे. यंदा मतदार कोणावर मोहोर उमटवात त्याची उत्सुकता आहे.