लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिल्यानंतर, शिवसैनिक चांगलेच संताप अनावर झाला. त्यांनी महाड नांगलवाडी येथे रात्री निदर्शने करत मुंबई गोवा महामार्ग दोन तास रोखून धरला. सुनील तटकरे यांचा निषेध करत त्यांनी टायर्सची जाळपोळही केली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Central Election Commissioner refutes opposition allegations no discrepancy in counting of ballot papers
मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर

गेल्या महिन्याभरापासून प्रतिक्षेत असलेली पालकमंत्रीपदाची यादी राज्यसरकारच्या वतीने शनिवारी संध्याकाळी जारी करण्यात आली. शिवसेना आमदारांचा विरोध डावलून रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना देण्यात आले. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या आस लावून बसलेल्या भरत गोगावले यांच्या पदरी घोर निराशा आली. त्यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळाले नाहीच, पण इतर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही दिले नाही. त्यामुळे शिवसैनिकांचा संताप अनावर झाला.

आणखी वाचा-रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय चुकीचा, भरत गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी

शनिवारी रात्री उशीरा शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी महाड शहरालगत नांगलवाडी फाट्यावर उतरून निदर्शनाला सुरूवात केली. शेकडो शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जवळपास दोन तास रोखून धरली. टायर्सची जाळपोळ करण्यात आली. वारंवार विनंती करूनही शिवसैनिक मागे हटण्यास तयार नव्हते. अग्निशमन दलाला पाचारण करून टायर्सची आग विझवण्यात आली. गोगावले समर्थकांनी यावेळी तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला. गोगावलेच पालकमंत्रीपदी हवेत अशा घोषणा दिल्या गेल्या. कोकणात सगळे आमदार शिवसेना भाजपचे असूनही रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला का असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत होते.

आणखी वाचा-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही संघाची मदत; पंतप्रधान मोदींनंतर भाजपाचे मंत्री RSS शी चर्चा करणार

राज्यात शिवसेना भाजपचे सरकार आणण्यात भरत गोगावले यांचा मोठा वाटा होता. मात्र तरीही त्यांना डावलून रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यात आले. हा गोगावले यांच्यावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे जोवर रायगडचे पालकमंत्रीपद गोगावले यांना मिळणार नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निर्धार संतापलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जवळपास दोन तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक शिवसैनिकांनी रोखून धरली होती. अखेर पोलीसांनी त्यांची समजूत काढून महामार्ग मोकळा केला. आणि वाहतूक सुरळीत केली.

Story img Loader