कोल्हापूर : ‘पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जायचे आहे’ असे विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंधरवड्यापुर्वी करून एका अर्थाने कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाचे संकेत दिले होते. पण त्यांच्याकडे वाशिम या दूरच्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्याचे मुश्रीफ यांचे स्वप्न भंगले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्यांदाच मंत्री झालेले प्रकाश आबिटकर आणि सह पालकमंत्री पदाची जबाबदारी पुण्याच्या माधुरी मिसाळ यांच्याकडे आल्याने भाजप – शिवसेना शिंदे गटाकडूननु मुश्रीप यांना शह दिल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीला दूर ठेवण्याकरिता जिल्ह्यात शिवसेना व भाजपमध्ये तह झाल्याची चर्चा यातून रंगली आहे.

आणखी वाचा-एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल कशामुळे घेतली ?

कोल्हापूरचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले असताना दुसरीकडे जिल्ह्यातील आमदारांमध्ये अंतर्गत चुरस असल्याचेही दिसत होते. जिल्हा वरिष्ठ मंत्री असल्याने मुश्रीफ यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी सोपवली जाईल असा तर्क व्यक्त केला जात होता. त्यांनी वारंवार याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे म्हणायला सुरुवात केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदणी गावातील एका धार्मिक कार्यक्रमासाठी यायच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कार्यक्रमात अभ्यागतांशी बोलताना ‘ पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जायचे आहे’ असे विधान केले होते. पोटातील जणू ओठावर आले होते. साहजिकच त्यांच्याकडेच पालकमंत्री पद येणार या चर्चेला बळकटी मिळाली.

याचवेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रकाश आबिटकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. पुणे जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच जाणार असे संकेत असल्याने मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील हे पाच वर्षाच्या अवधीनंतर पुन्हा पालकमंत्री होतील, यावर कार्यकर्ते ठाम होते. तशी मागणीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. या तिहेरी स्पर्धेत आबिटकर यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या जोडीला आता माधुरी मिसाळ याही आल्या आहेत.

आणखी वाचा-भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा ‘पार्सल’ पालकमंत्री; परंपरा कायम

जिल्ह्यात एकनाथ शिंदे शिवसेनेचे तीन आमदार व एक पाठिंबा दिलेले असे चार आमदार असल्याने संख्याबळाच्या आधारे आबिटकर यांना पालकमंत्री पद दिल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे दोन आमदार, एक बंडखोर आमदारआणि जनसुराज्य दोन असे भाजपशी निगडित पाच आमदार असतानाही हे सर्वजण कोरे राहिले आहेत. तर जिल्ह्यात दोन असणारे आमदार संख्याबळ एकच राहिल्याने मुश्रीफ यांना त्याचा मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद हुकण्याचा फटका बसला असल्याचे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp reach agreement over kolhapurs guardian minister post print politics news mrj