नवी मुंबई : नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट होताच महायुतीत दुहीचे वारे वाहू लागले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा यांनी बंडाची तयारी सुरु केली असून बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ( शरद पवार) उमेदवारी मिळावी यादिशेने त्यांची वाटचाल सुरु असल्याचे वृत्त आहे. या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या उमेदवारीचे आव्हान आहे. नाईक आणि म्हात्रे यांच्यापैकी नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच नहाटा यांच्या भूमीकेमुळे येथील निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नहाटा यांनी त्यांची साथ धरली होती. शिंदे यांच्या पक्षाचे उपनेते असलेले नहाटा यांनी शिवसेना एकसंघ असताना २०१४ मध्ये बेलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढवली होती. मंदा म्हात्रे, गणेश नाईक यांच्या सोबत झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत नहाटा यांचा चार हजार मतांनी पराभव झाला होता. २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेने विधानसभेची निवडणुक एकत्र लढवली होती. त्यावेळी नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले. त्यामुळे इच्छा असूनही नहाटा यांना निवडणुक लढविता आली नव्हती. दरम्यान बेलापूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मिळावी यासाठी नहाटा प्रयत्नशील होते. मात्र ही जागा भाजपला सुटेल हे स्पष्ट होऊ लागल्याने त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातील प्रवेशाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

हेही वाचा >>> हरयाणाच्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपला बळ

भाजपमध्ये उमेदवारी कुणाला ?

बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार असल्या तरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या मतदारसंघातून यंदा उमेदवारीवर दावा केला आहे. संदीप यांनी गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत म्हात्रे यांनाच आव्हान निर्माण केले असल्याने भाजपमधील या द्वद्वात ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणे कठीण असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर नहाटा यांनी आपल्या काही समर्थकांसह काॅग्रेसच्या स्थानिक नेत्यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी एक बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीत त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाची साथ करण्याचे नक्की केल्याची माहिती नहाटा यांच्या निकटवर्तीय सुत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसात यासंबंधी ते अधिकृत निर्णय जाहीर करतील असेही समजते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ऐरोली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर बेलापूर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेसला सुटेल असे बोलले जाते. त्यामुळे नहाटा यांनी थोरल्या पवारांची साथ धरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

हेही वाचा >>> मराठवाड्यात पुन्हा एकदा ‘ जोडू या अतुट नाती’ चा खेळ

नवी मुंबईत शिवसेनेची पाळेमुळे खोलवर जावीत यासाठी गेली १५ वर्ष मी सातत्यापुर्ण काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या पक्षाशी हजारो कार्यकर्ते मी या काळात जोडले. शहरातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असे असताना शहरातील एकाच कुटुंबाच्या पालख्या वाहण्याचे काम आमच्या माथी मारले जात असेल तर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. मी माझी भूमीका दोन दिवसात जाहीर करेन. -विजय नहाटा , उपनेते शिवसेना (शिंदे)

Story img Loader