रत्नागिरी : राज्य शासनाच्या पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना पालकमंत्री पदावर डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद पुन्हा उदय सामंत यांना देण्यात आले आहे. मात्र आमदार योगेश कदम यांना कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांना डावळल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार निवडून आले होते. त्यामध्ये दापोली खेड  विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम हे पुन्हा आमदार झाले. तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद यापूर्वी देखील आमदार उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले होते. यावेळी देखील हे पद आमदार उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्री पदे देण्यात आली. त्यामध्ये आमदार उदय सामंत यांना पुन्हा उद्योग मंत्री पद देण्यात येऊन त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पदी देण्यात आले. तसेच दापोली खेड मतदार संघातील आमदार योगेश कदम यांना गृहराज्यमंत्री पद देण्यात आले. या मंत्रीपदानंतर आमदार योगेश कदम यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा दापोली खेड  विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आमदार योगेश कदम यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलेले नाही. यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>>शिवसेनेच्या विरोधानंतरही मुलीसाठी पालकमंत्रीपद मिळवण्यात सुनील तटकरे यशस्वी…

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमदार योगेश कदम पालकमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे वक्तव्य यापूर्वी केले होते. तसेच आमदार उदय सामंत  एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की, आमदार योगेश कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद उदय सामंत यांनीच स्वीकारावे, असे सांगितले असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आमदार योगेश कदम हे पालकमंत्री पदाच्या शर्यतेतून बाहेर असल्याचे लक्षात आणून देण्याचे काम आमदार उदय सामंत यांनी केले होते. मात्र या वेळच्या सरकारमध्ये मंत्री योगेश कदम यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची असताना त्यांना पालकमंत्री पदापासून डावळण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या डावळण्यात आलेल्या पालकमंत्री पदाबाबत माजी आमदार रामदास कदम आणि राज्यमंत्री आमदार योगेश कदम कोणता निर्णय घेतात याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena is unhappy after yogesh kadam from ratnagiri district was left out of the list for the post of guardian minister amy